आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना संबंधित जिल्हा परिषदांनी खालील प्रमाणे कार्यवाही
13 आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना संबंधित जिल्हा परिषदांनी खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
13.1 दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या सर्व शिक्षकांच्या नियुक्ती दिनांकानुसार सर्वप्रथम जेष्ठता याद्या तयार करण्यात याव्यात.
13.2 यानंतर या यादीतील इच्छुक असलेल्या शिक्षकांना आदिवासी व नक्षलग्रस्त भागात नेमणूक देण्यात यावी. इच्छुक असल्यास कनिष्ठ शिक्षकांना त्या भागात नेमणूक देण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील सर्व जागा भरण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
13.3 त्यानंतर वरील जेष्ठता यादीतील इच्छुक शिक्षकांना अवघड क्षेत्रात नियुक्ती देण्यात यावी. कोणीही इच्छुक नसल्यास, इच्छुकांची संख्या कमी असल्यास सेवा ज्येष्ठता यादीनुसार कनिष्ठ तम शिक्षकांना अवघड क्षेत्रातील रिक्त जागी नेमणूक देण्यात यावी.
13.4 वरील प्रमाणे रिक्त जागा संपूर्ण भरल्यानंतर जिल्ह्यातील ज्या तालुक्यात रिक्त जागांची टक्केवारी सर्वाधिक आहे. अशा तालुक्यातील रिक्त जागा भरण्यात याव्यात. हे करताना इच्छुक शिक्षकांना त्यांच्या ज्येष्ठते प्रमाणे नियुक्ती देण्यात यावी व उरलेल्या रिक्त जागांवर नियुक्तीसाठी स्वेच्छेने कोणी मागणी करीत नसल्यास अशा जागांवर समुपदेशनाने नेमणुका कराव्यात.
13.5 अशा प्रकारे क्रमाने रिक्त जागांची अधिक पासून कमी टक्केवारी असणाऱ्या तालुक्यातील जागा भरण्यात येतील.
13.6 जिल्हा परिषदेमध्ये हजर होणाऱ्या शिक्षकांची आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी जेष्ठता याद्या तयार करून दर मंगळवारी उपलब्ध रिक्त जागांवर त्यांची समुपदेशनाने पदस्थापना देण्यात यावी.
14 आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना संबंधित जिल्हा परिषदांनी उपरोक्त मुद्दा क्रमांक 13 मध्ये नमूद केल्या प्रमाणे कार्यवाही करण्यापूर्वी विषय संवर्ग भाग एक व विषय संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही करावी.
14.1 विशेष संवर्ग भाग 1 या संवर्गातील शिक्षकांना सर्व प्रथम प्राधान्याने समायोजना ने पदस्थापना देण्यात यावी. अशी पदस्थापना देताना पूर्ण जिल्ह्यात ज्याठिकाणी बदलीने नियुक्ती देण्यास रिक्त जागा असतील त्या रिक्त जागेवर त्यांच्या सोयीनुसार पदस्थापना देण्यात यावी, म्हणजेच या संवर्गात पदस्थापना देताना मुद्दा क्रमांक 13 मध्ये नमूद भरती करण्यात येणारे पदाचा प्राधान्यक्रम विचारात घेऊ नये.
14.2 विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांना पदस्थापना दिल्यानंतर विशेष संवर्ग भाग-2 या संवर्गातील शिक्षकांना पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी. अशी कार्यवाही करताना आंतर जिल्हा बदलीने संबंधित जिल्ह्यात आलेल्या व्यक्तीचा जोडीदार त्याच जिल्ह्यात कार्यरत असल्यास अशा आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना उपरोक्त मुद्दा क्रमांक 13 मध्ये नमूद सूचनेनुसार जी पदे प्राधान्याने भरणे आवश्यक आहे. अशा जागी त्यांना नियुक्ती द्यावी या नियुक्तीने संबंधित शिक्षकांना त्यांच्या जोडीदारापासून 30 किमी परिसरात नियुक्ती मिळत नसल्यास संबंधित शिक्षक व त्याचा जोडीदार जि प दे प्राधान्याने भरणे हा व शक्य आहे अशा पदावर दोघांना नियुक्ती द्यावी.
झालेली अंतर जिल्हा बदली रद्द कशी करावी ?
जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्या बाबत सुधारित धोरण निश्चित झाल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षकांची त्यांच्या पसंतीनुसार दिलेल्या जिल्ह्यात जरी आंतर जिल्हा बदली झाली तरी त्यांनी सदर जिल्ह्यातील बदली रद्द करण्याची विनंती केल्यानंतर त्यांच्या बदल्या रद्द करण्यास परवानगी देण्यात येते, या संदर्भात खालीलप्रमाणे धोरण निश्चित करण्यात येत आहे.
15.1 आंतर जिल्हा बदली आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षकास ती बदली नको असल्यास ती बदली रद्द करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका महिन्याच्या आत बदली रद्द करण्यासाठी अर्ज देणे आवश्यक राहील एका महिन्यानंतर अशी बदली रद्द करता येणार नाही.
15.2 बदली रद्द करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्णय घेताना त्या जिल्हा परिषदेमध्ये त्या संवर्गाची जागा रिक्त असल्याची खातरजमा करावी. अशा प्रकारे संवर्गाची जागा रिक्त नसल्यास बदली करता येणार नाही.
15.3 आंतरजिल्हा बदली रद्द करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचाच राहील.
15.4 आंतर जिल्हा बदली आदेश रद्द करणे हा संबंधित शिक्षकाचा हक्क नाही याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचा निर्णय अंतिम असेल व त्या निर्णयाच्या विरुद्ध विभागीय आयुक्त अथवा शासनाकडे अपील विनंती करता येणार नाही.
15.5 अशा शिक्षकांना नियुक्तीच्या मूळ जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या निवडीच्या प्रवर्गाची जागा रिक्त असल्यास त्यांची मूळ जिल्हा परिषदेत नियुक्ती कायम ठेवण्यात येईल, परंतु यापुढे आंतरजिल्हा बदलीने झालेली बदली रद्द करून त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत जाण्याची विनंती करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या संवर्गातील सेवाजेष्ठता गमवावी लागेल. आंतरजिल्हा बदली रद्द करून जे शिक्षक त्यांच्या नियुक्तीच्या मूळ जिल्हा परिषदेत जातील अशा शिक्षकांची त्यांच्या नियुक्तीच्या मूळ जिल्हा परिषदेमध्ये फेरनियुक्ती गृहीत धरून त्यांना सेवा जेष्ठते मध्ये सर्वात कनिष्ठ जागी दर्शविण्यात येईल.
15.6 जे शिक्षक आंतर जिल्हा बदली झाल्यानंतर सदर बदली बदली रद्द करतील त्या शिक्षकांना पुढील पाच वर्षाच्या कालावधीत आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
16 पहिल्या आंतर जिल्हा बदली पाच वर्षाचा कालावधी झाल्यानंतर दुसऱ्यांदा आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करता येईल.
17 आंतरजिल्हा बदलीसाठी शासन स्तरावर कोणतीही अर्ज स्विकारले जाणार नाहीत तसेच अन्य मार्गांनी दबाव आणल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल .
बदली तक्रार बाबत
18. आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रांच्या सत्यतेबाबत काही तक्रारी असल्यास अशा तक्रारीची मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी तक्रारीची शहानिशा करून निर्णय देण्यात यावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला निर्णय अंतिम असेल.
19. आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यांच्या काही कारणास्तव तक्रारी असल्यास अशा कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागीय आयुक्त यांचेकडे तक्रारी कराव्यात. संबंधित विभागीय आयुक्तांनी तक्रार प्राप्त झाल्यास, प्रकरण तक्रारीची शहानिशा करून तीस दिवसात निर्णय घ्यावा. विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या निर्णय अंतिम असेल. आंतरजिल्हा बदली च्या प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
मुद्दा क्र. 15.2 बदली रद्द करता येणार नाही असा शेवट पाहिजे ना!
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .