UDISE PLUS

 


UDISE PLUS


 

 घटक 

 

लिंक 

 UDISE PLUS वेबसाईट 

 link

 

 

 UDISE PLUS मराठी नमुना जुना  ( फक्त मार्गदर्शक )

 Download

 

 

 UDISE PLUS इंग्रजी नमुना 

 Download

 

 

  UDISE PLUS मराठी नमुना new

 download

 

 

 

 

 

 


udise कसा certify  करावा ?   
  •    सर्वप्रथम आपल्याला यु-डायस + वेबसाईटला लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर क्लिक हिअर टू ओपन द टाटा याला click  कराव लागेल.
  •  त्याला क्लिक केल्यानंतर आपले भरलेला यु-डायस व  भरलेले सर्व फॉर्म  दिसतील. आपल्या 40 टॅब भरून पूर्ण झाल्या असतील, कम्प्लिट झाल्या असतील तरच त्यानंतर दिसणाऱ्या 41 नंबर ला Detailed Report Card (DRC) & School Report Card (SRC)  चेक करायचा आहे.
  •  त्यानंतर 42 नंबरच्या  Comparison and Certify Data ला क्लिक करावे लागेल.
  •  क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ओपन होणाऱ्या पेजवर सर्वात खाली डाव्या बाजूला असलेल्या Certification Module याच्यामध्ये check box मध्ये click करून  Declared By व Designation टाकावे (मुख्याध्यापक नाव व पद). 
  • त्या  नंतर मोबाईल नंबर टाकून  सर्वात खाली असलेल्या सर्टिफाईड टाटा क्लिक करून आपला डाटा आपल्याला सर्टिफाईड करता येईल.
  • एकदा का data certify झाला कि पुन्हा माहितीत बदल करता येत नाही, त्यामुळे माहिती भरून खात्री झाली तरच  data certify करावा.             
  • udise कसा  भरावा ?                 

            UDISE PLUS भरण्यास पोर्टल सुरु झाले असून तुम्ही थेट https://udiseplus.gov.in/udiseplus/home येथूनही पोर्टलवर थेट  जावू शकता. प्रथम वरील लिंक/वेबसाईट वर जावून आपला udise टाकून त्यानंतर passward टाकावा. captcha टाकून login व्हावे.

 (Passward - Passward आपणास मागील वेळचाच टाकावयाचा आहे . जर मागील पासवर्ड सापडत नसेल / हरवला असेल तर आपण आपला udise नंबर व मागील रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाकून passward फरगेट करून नवीन मिळवता येईल.)

 किंवा 

Block MIS can be contacted in case the School users forgot their Username/Password OR in case of changed mobile number/other details


  • Udise भरताना कोणती काळजी घ्याल ?

            Udise Plus login झाल्यानंतर आपणास click here to open DCF to fill the DATA याला click करावे लागेल .त्यानंतर समोर दिलेल्या सूचना वाचून ok ला click करावे लागेल . आपणास समोर १२ Section दिसतील व एकाखाली एक ४३ फॉर्म दिसतील. त्या प्रत्येक फॉर्म ला click करून आपणास सर्व फॉर्म एकेक करून open करावे लागतील.  सर्व फॉर्म एकेक open करून माहिती भरावी/सिलेक्ट करावी लागेल.स्टार केलेली माहिती भरणे बंधन कारक आहे.  सर्व फॉर्म भरून save करून Next करावे लागेल .जर एखादा मुद्दा भरायचा राहिला असेल तर फॉर्म save न होता लाल backround मध्ये सूचना येईल.यावेळी तुम्हाला काय भरायचं राहील आहे ते पाहून  पुन्हा राहिलेले मुद्दे भरावे लागतील . सन ३० सप्टेंबर २१-२२ ची माहिती भरायची आहे .काही ठिकाणी २०-२१ ची माहिती देखील विचारली आहे ते साल पाहून खात्री करूनच माहिती भरा . आपला पट व संख्यात्मक माहिती जुळेल अशी काळजीपूर्वक भरा . udise चा मराठी कच्चा नमुना भरून आपण ऑनलाईन data भरल्यास माहिती पटकन भरून होते . प्रत्येक फॉर्म व्यवस्थित भरला असेल तर मात्र हिरव्या backround मध्ये मेसेज येईल . त्यानंतरच  पुढे save करून Next म्हणा.  आपण फॉर्म वर असलेल्या DCF NO ला click करून देखील थेट त्या त्या फॉर्म वर जावून थेट माहिती  भरू शकता .स्टार केलेली माहिती भरणे बंधनकारक आहे. ४० नंबर च्या फॉर्म पर्यंत माहिती भरून save करावी लागेल.४१ नंबर ला माहिती भरलेला DCF फॉर्म व School Report Card download करून चेक करावा लागेल. (Detailed Report Card (DRC) & School Report Card (SRC) Can be downloaded Once in Every hour.)  ४२ नंबर फॉर्म  ला माहिती Certify Data करावा लागेल . जोपर्यंत Certify Data करत नाही,तोपर्यंत आपणास माहिती मध्ये कधीही बदल करता येईल. Udise भरण्यासाठी शुभेच्छा....!!!
     
                                   

Udise plus २०२२  साठी दि १३ एप्रिल २०२२ रोजी आलेले नवीन परिपत्रक पहा, मार्गदर्शक सूचना व मुदत पहा. download हि करा. 




Udise plus २०२२  साठी दि 26 मे  २०२२ रोजी आलेले नवीन परिपत्रक पहा, मार्गदर्शक सूचना व मुदत पहा. download हि करा. 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. सन २०२१-२२ चा मराठी फॉर्म मिळाला तर बरं होईल. तुम्ही पाठवलेला फॉर्म हा जूना आहे. या वर्षीच्या यु डायस मध्ये बरेचसे बदल आहे

    उत्तर द्याहटवा
  2. माझ्याकडे आहे नवीन

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .