पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ दिनांक व फॉर्म मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक २२/०४/२०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक संदर्भात व द्वितीय नूतन मुदतवाढ संदर्भात परिपत्रक काढलेल आहे. या परीपत्रकानुसार पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2022 ची अधिसूचना परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर परीक्षा 20 जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याचे प्रस्तावित असून त्याकरिता शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी दिनांक 23 एप्रिल 2022 ते दिनांक 30 एप्रिल 2022 या कालावधीत तसेच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिनांक २ मे 2022 रोजी पर्यंत द्वितीय मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत दिनांक 30 एप्रिल 2022 नंतर ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने आवेदन पत्र तसेच २/५/२०२२ नंतर शुल्क भरता येणार नाही ,असे परिपत्रका मध्ये म्हणले आहे .
अधिक माहिती साठी खालील परिपत्रक पहा,वाचा व download करा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .