संकलित मूल्यमापन




संकलित मूल्यमापन 

         संकलित मूल्यमापन म्हणजे ठराविक काळानंतर एकत्रित स्वरूपात करावयाचे मूल्यमापन.
                  प्रथम सत्राच्या अखेरीस पहिले संकलित मूल्यमापन करावे. द्वितीय सत्राच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करण्यात यावे. संकरित मूल्यमापनात विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश करावा. आकारिक आणि संकरित मूल्यमापनाचा भारांश पुढीलप्रमाणे राहील.

                                         
         संकलित मूल्यमापन प्रथम व द्वितीय सत्राच्या अखेरीस लेखी, तोंडी व  प्रात्यक्षिक स्वरूपात करण्यात यावे. लेखी स्वरूपातील साधनांमध्ये मुक्तोतरी प्रश्नांचा अधिक वापर करण्यात यावा. संविधानातील मूल्ये, गाभाघटक, जीवन कौशल्य व दूरगामी उद्दिष्टे या संदर्भातील मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने विचार करण्यात यावा.
2.1 पहिले संकलित मूल्यमापन प्रथम सत्राच्या अखेरीस व दुसरे संकलित मूल्यमापन द्वितीय सत्राच्या अखेरीस तोंडी, प्रात्यक्षिक, वर्ग स्तरावर, शाळा स्तरावर, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी ठरवून करावे. 
2.2 संपूर्ण शिक्षण प्रक्रिया आज आनंदी असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आपली मते मुक्तपणे व सहजतेने देता येतील व्यक्त करता येतील अशा रीतीने मूल्यमापन करावे. मूल्यमापन यामुळे मुलांना भीती दडपण वाटणार नाही याची दक्षता घ्यावी. 
2.3 प्रत्येक शिक्षकांनी मूल्यमापन करण्यासाठी विषयाची उद्दिष्टे पहावीत व त्यानुसार मूल्यमापनाची कार्यपद्धती ठरवावी. 
2.4 विहित विषयांचे ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, अभिरुची, अभिवृत्ती, रसग्रहण, इत्यादी उद्दिष्टांची मूल्यमापन करण्यापूर्वी त्याविषयीचा वर्गात आवश्यक  तो पुरेसा सराव घ्यावा. 
2.5 संकलित मूल्यमापन यासाठी प्रश्न तयार करताना सर्व उद्दिष्टांना योग्य प्रमाणात भारांश द्यावा. तसेच वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी इयत्तानिहाय योग्य प्रमाणात भारांश निश्चित करावा. इयत्ता पहिली दुसरी व इयत्ता तिसरी ,चौथी साठी वस्तुनिष्ठ व लघुत्तरी प्रश्न अधिक असावेत. इयत्ता पाचवी ते आठवी साठी वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्नांसाठी अनुक्रमे सर्वसाधारणपणे 20%, 60 % व २० % असावा. 
2.6 प्रत्येक शाळेतील त्या त्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी विषय निहाय वर्गनिहाय संकलित मूल्यमापन करावे. कोणत्याही अन्य यंत्रणेकडून तयार करण्यात आलेली मूल्य मापनाची साधने तंत्रे आणि प्रश्नपत्रिका वापरल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
2.7 संकलित मूल्यमापन यासाठी साधने तयार करताना विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती, सर्जनशीलता आणि बहुविध बुद्धिमत्तेला वाव ठेवावा. त्यासाठी आवश्‍यकतेनुसार मुक्तोतरी प्रश्नांचा उपयोग करावा. यांत्रिक प्रतिसाद घोकंपट्टी यावर भर देणाऱ्या आणि स्मरणा वर आधारित प्रश्नांना वाव देऊ नये. 
2.8 संकलित मूल्यमापन चे वेळापत्रक वर्ग शाळा पातळीवर निश्चित करावे. मूल्यमापन करताना वेळेबाबत लवचिकता ठेवावी.
2.9 मूल्यमापनातून  निदर्शनात आलेल्या उल्लेखनीय बाबी तसेच वैयक्तिक गुणांची आवर्जून दखल घ्यावी आणि विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन अशा गुणांच्या विकासासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे.
2.10 अतिरिक्त पूरक मार्गदर्शन संकलित मूल्यमापन करताना जे विद्यार्थी संपादणूक की मध्ये मागे असल्याचे आढळून येईल अशा विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी त्रुटींचा शोध घ्यावा व त्यानुसार वेळच्या वेळी विद्यार्थ्यांना वैयक्तिक हटवा गटात अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून त्यांना अपेक्षित संपादणूक पातळीवर पातळीपर्यंत आणावे.
                                 
 श्रेणी पद्धतीचा वापर

               विद्यार्थ्यांना द्यावयाच्या प्रगती पत्रकात विद्यार्थ्यांची विषयवार संपादणूक त्यांनी प्राप्त केलेल्या गुणावरून खालील कोष्टकात दर्शवल्या नुसार श्रेणी मध्ये लिहावी. सर्व विषयांची सरासरी काढून संकलित श्रेणी नोंदवू नये. वर्गाचे गुणांकन वर्गांतर व श्रेणी तक्ता विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकात शैक्षणिक प्रगतीचे वर्णनात्मक हरित नोंदवावे. तसेच त्यामध्ये वैयक्तिक गुणांची नोंद करावी. मूल्यमापन करताना सकारात्मक शेळ्यांचा वापर करावा. तसेच इतर विद्यार्थ्यांशी तुलना करू नये. पालकांना मुलांच्या प्रगतीबाबत वेळच्या वेळी माहिती द्यावी. विद्यार्थी मूल्यमापनाच्या वेळी अनुपस्थित राहतील, त्यांचे पुन्हा मूल्यमापन करण्यात यावे सर्व विद्यार्थी वरच्या श्रेणी कडे वाटचाल करतील यासाठी शाळा व शिक्षकांनी प्रयत्नशील रहावे. विशेष करून व त्याखालील श्रेणीतील विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून किमान क दोन श्रेणी पर्यंत आणणे हे शाळा व शिक्षकांवर बंधनकारक राहील. मात्र अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्याच  इयत्तेत ठेवता येणार नाही.

गुणांचे वर्गांतर      

श्रेणी  

 

 

 

 

९१ % ते १०० %

 अ १ 

 

 

 ८१ % ते ९० %

 अ २

 

 

 ७१ % ते ८० %

 ब १

 

 

 ६१ % ते ७0 % 

 ब २

 

 

 ५१ % ते ६० % 

 क १ 

 

 

 ४१ % ते ५0 % 

 क २

 

 

 ३३ % ते ४० %

 ड

 

 

 २१ % ते ३२ % 

 ई १

 

 

  २० % व त्यापेक्षा कमी 

 ई २

 

 

 

 

 

 

 

 


                         

सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन शासन निर्णय दि २० ऑगस्ट २०१० 


मूल्यमापन संदर्भात अत्यंत महत्वाचे व मार्गदर्शक pdf


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.