भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने विविध शालेय स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन
दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा आणि अध्यापक विद्यालया मध्ये खालील विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी ,विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा.
इयत्ता पहिली ते पाचवी
1 वक्तृत्व स्पर्धा
2 एक पात्री अभिनय ( वेशभूषा सह) स्पर्धा
3 चित्रकला स्पर्धा
विषय
1 मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय
2 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग
3 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण
वक्तृत्व आणि एकपात्री अभिनय (वेशभूषे सह) दिलेल्या तीन पैकी कोणत्याही विषयावर तीन मिनिटांचा व्हिडिओ करून अपलोड करणे.
चित्रकला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग या विषयावर A 4 आकाराच्या कागदावर चित्र काढून त्याचा फोटो अपलोड करावा.
इयत्ता सहावी ते आठवी
1 निबंध लेखन
2 वक्तृत्व
3 स्वरचित कविता
4 काव्यवाचन
5 पोस्टर निर्मिती
6 रांगोळी स्पर्धा
विषय
1 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग
2 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी पैलू
निबंध लेखन दिलेल्या तीन पैकी कोणत्याही विषयावर 300 ते 500 शब्दा पर्यंत A 4 आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा.
वक्तृत्व दिलेल्या तीन पैकी कोणत्याही विषयावर भाषण करून त्याचा तीन मिनिटांचा व्हिडिओ करून अपलोड करणे.
स्वरचित कविता लेखन आणि काव्यवाचन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित स्वरचित कविता A 4 आकाराच्या कागदावर लिहून त्याचा फोटो अपलोड करावा आणि काव्य वाचनासाठी काव्य म्हणून त्याचा तीन मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करावा.
पोस्टर निर्मिती आणि रांगोळी स्पर्धा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग व त्यांच्या जीवनातील विविध पैलू यावर पोस्टर तयार करून त्याचा फोटो अपलोड करावा.
इयत्ता नववी ते बारावी चे विद्यार्थी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
1 निबंध लेखन
2 वक्तृत्व
3 व्हिडिओ निर्मिती
4 दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह
5 एकांकिका
6 एक पात्री अभिनय
7 कथाकथन
8 रांगोळी
विषय
1 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु तथागत गौतम बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले
2 सम्राट अशोक आणि भारताची राष्ट्रीय प्रतीके
3 माझी शाळा माझे ग्रंथालय
4 माझ्या घरातील समृद्ध ग्रंथालय
निबंध लेखन आणि वक्तृत्व स्पर्धा सोबत दिलेल्या विषयावर निबंधासाठी A 4 आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा आणि वक्तृत्व साठी तीन मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करावा.
व्हिडिओ निर्मिती इंटरनेट वरील फोटोंचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग दर्शवणारी तीन मिनिटांची व्हिडिओ क्लिप तयार करून अपलोड करावी.
दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनातील प्रसंग आणि त्यांचे कार्य सांगणारे फोटोंचा कोलाज तयार करून त्याचा फोटो अपलोड करावा.
कथा कथन एकांकिका व एक पात्री अभिनय आणि रांगोळी स्पर्धा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनातील प्रसंग आणि त्यांचे कार्य सांगणारा तीन ते पाच मिनिटांचा व्हिडिओ तयार करून अपलोड करावा आणि या विषयावर रांगोळी काढून त्याचा फोटो अपलोड करावा.
उपरोक्त प्रमाणे विद्यार्थी व शिक्षक यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून सादरीकरणासाठी दोन ते तीन मिनिटांचा सुस्पष्ट व्हिडिओ फोटो व इतर साहित्य समाज संपर्क माध्यमावर ( फेसबूक, ट्विटर ,इन्स्टाग्राम) #muknayak या HASHTAG(#) चा वापर करून अपलोड करण्यात यावा व त्या पोस्टची लिंक https://scertmaha.ac.in/competitions/ या लिंक वर अपलोड करावी. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत उत्कृष्ट उपक्रमांचा यथोचित सन्मान करण्यात येईल.
अधिक माहिती करिता आपण वरील स्पर्धांचे नियोजन खालील GR शासन निर्णय खाली पाहू शकता .
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .