शालेय पोषण आहार बचतगटाची,स्वयंपाकीची कामे व जबाबदारी





 शालेय  पोषण आहार बचतगटाची,स्वयंपाकीची कामे 


                    शासन निर्णय दि २ फेब्रुवारी २०११ नुसार  स्वयंपाकी तथा मदतनीस या कामासाठी ग्रामीण भागांमध्ये महिला बचत गट किंवा स्वयंसेवी संस्था किंवा मानधनी तत्त्वावरील स्वयंपाकी पदासाठी स्वतंत्रपणे अनुदान देण्यात येणार असल्याने त्यांनी खालील प्रमाणे कामे करणे आवश्यक राहिल.

महत्त्वाची कामे 

१ अन्न शिजवण्याचे काम करणे.

२ तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे.

३ शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप जेवणाच्या जागेवर करणे.

४ शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर साफसफाई करणे.

५ स्वयंपाक ग्रहांसह तसेच सांडलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट लावणे.

6 भांड्यांची साफसफाई करणे.

7 जेवल्यानंतर ताटांची स्वच्छता करणे.

8 पिण्याचे पाणी भरणे.

9 जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे.

10 शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे.

11 अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेच्या आहार विषयक नोंदी ठेवणे.


 वरील कामांचा उल्लेख असणारा दि  २ फेब्रुवारी २०११ चा GR download करण्यासाठी येथे click करा.

                                       

इतर कामे व जबाबदारी 

 शासन निर्णय दि  26 फेब्रुवारी 2014 नुसार

  1      मालाची  मागणी नोंदवणे . तपासून ताब्यात घेणे व मालाच्या नोंदी घेणे ही कामे करणे.

२  ग्रामीण भागातील धान्य साठा सुस्थितीत व  सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्वस्वी बचत गटाची / शिजवणाऱ्या यंत्रणेची  राहील. धान्याचा हिशोब बचत गटाने ठेवावा .

३  निकृष्ट दर्जाच्या आहाराचा पुरवठा झाल्यास अथवा विष बाधा झाल्यास, शिल्लक माल व नोंदीनुसार आवश्यक माल मध्ये तफावत आढळल्यास बचत गटावर स्वयंपाकी/ मदतनीस वर कारवाई करण्याबाबत शिफारस मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे करावी.त्यावर योग्य ती कारवाई गटशिक्षणाधिकारी करतील .  त्यामुळे हे काम स्वयंपाकीला जबाबदारीनेच करावे लागेल.

4 शालेय पोषण आहार योजनेचे  कामकाज फक्त मुख्याध्यापकाने न पाहता इतर शिक्षकांनी दिवसानुसार वाटून घ्यावा .त्यामुळे सर्व शिक्षकांचा सहभाग योजनेत राहील . 

आहाराची चव प्रथम आहार तयार करणारा स्वयंपाकी यांनी घ्यावी, नंतर शाळा व्यवस्थापन समिती किंवा त्यांचे प्रतिनिधी, त्यानंतर मुख्याध्यापक किंवा त्या योजनेची संबंधित शिक्षक यांनी नोंद घ्यावी.

शालेय पोषण आहारा मधून विषबाधेचा प्रकार घडल्यास संबंधित बचत गटाला जबाबदार धरण्यात येईल.

२६ फेब्रुवारी २०१४ चा GR download करण्यासाठी येथे click करा.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.