आकारिक मूल्यमापन


आकारिक मूल्यमापन 

    ( विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आकार घेत असताना नियमितपणे करावयाचे  मूल्यमापन)
       
          सर्व शिक्षकांनी खालील साधन तंत्रे उपयोगात आणून वर्ग पातळीवर विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन करावे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या त्यासंबंधीच्या आवश्यक नोंदी ठेवाव्यात. 
१  दैनंदिन निरीक्षण 
२  तोंडी काम (प्रश्नोत्तरे, प्रकट वाचन, भाषण ,संभाषण ,भूमिका ,अभिनय, मुलाखत, गटचर्चा, इत्यादी)
 3 प्रात्यक्षिके / प्रयोग 
4 उपक्रम / कृती ( वैयक्तिक ,गटात, स्वयंअध्ययन द्वारे )
5 प्रकल्प  
6 चाचणी (वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारिक स्वरूपात घ्यावयाची छोटी कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकासह चाचणी (ओपन बुक टेक्स )
7 स्वाध्याय / वर्ग कार्य (माहिती लेखन, वर्णन, लेखन, निबंध लेखन, अहवाल लेखन, कथालेखन, पत्र लेखन, संवाद लेखन व कल्पनाविस्तार इत्यादी इतर )
8 इतर : प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, गटकार्य, अशा प्रकारची अन्य साधने 
    
          आकारिक मूल्यमापनात वरील मूल्यमापनाची साधन तंत्रे यापैकी इयत्ता, विषय आणि उद्दिष्टे विचारात घेऊन अधिकाधिक साधन तंत्राचा वापर करावा. यात किमान पाच साधने तंत्रे यांचा वापर करावा. कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयांसाठी किमान तीन साधने तंत्रे यांचा वापर करावा. प्रत्येक साधन तंत्रास योग्य भारांश द्यावा. तसेच विद्यार्थी वर्षभरात किमान एक प्रकल्प करतील असे पाहावे. प्रत्येक सत्रात किमान एक छोट्या कालावधीची लेखी चाचणी / पुस्तकासह लेखी चाचणी (ओपन बुक टेस्ट) घ्यावी. विद्यार्थी विषय आणि उद्दिष्टे इत्यादी नुसार उपरोक्त साधं तंत्राच्या उपयोगाबाबत आकारिक मूल्यमापनात लवचिकता राहील.
                                       
 आकारिक मूल्यमापन यासाठी सूचना

           विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक असा सर्वांगीण विकास होऊन त्यांची व्यक्तिमत्व कसे आकाराला येत आहे हे नियमितपणे पडताळून पाहणे म्हणजेच आकारिक मूल्यमापन. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये आकारिक मूल्यमापन ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे आकारिक मूल्यमापन गांभीर्याने करणे आवश्यक आहे.
 1.1 आकारिक मूल्यमापन करण्यासाठी आठ साधन तंत्रे वापरून केलेल्या मूल्यमापन मधील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद/ सहभाग विचारात घ्यावा. मूल्यमापनाचा विचार जीवन कौशल्यांच्या अंगाने करावा. विद्यार्थ्यांची जिज्ञासा, शोधक वृत्ती, चिकित्सक वृत्ती, सर्जनशील विचार करण्याची क्षमता, संवेदनशीलता, विद्यार्थ्याचे परस्परांशी असलेले संबंध, सहज संवाद साधण्याची क्षमता, ताणतणावांना तोंड देण्याची भावनिक ताकद, या सर्व गोष्टीची दखल घ्यावी. ही सर्व कौशल्ये विद्यार्थ्यांच्या वर्तनात दृश्य स्वरूपात येण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांशी वेळोवेळी सुसंवाद साधावा. त्यामुळे शिक्षण प्रक्रिया ,उद्दिष्टनृप व जीवनाभिमुख होण्यास मदत होईल. 
1.2 आकारिक मूल्यमापन यामधून संविधानातील मूल्ये गाभा घटक व जीवन कौशल्य यांचे मूल्यमापन व्हावे.
1.3 प्रत्येक सत्रातील आकारिक मूल्यमापन यामध्ये सातत्य रहावे. वरील आकारिक ८ साधन तंत्र पैकी विषय व उद्दिष्टानुसार उपयुक्त मूल्यमापन साधनाद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात यावे. 
1.4 कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते, शिक्षण प्रक्रिया जीवनाशी जोडले जाते व मूल्यांचा परिपोष होतो, त्यामुळे या विषयांचे मूल्यमापन योग्य प्रकारे करून विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन द्यावे, 
1.5 आकारिक मूल्यमापन करताना शिक्षकांच्या मार्गदर्शनातील उणिवा आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी दूर होऊन विद्यार्थ्यांची मूलभूत संबोध व कौशल्य दृढ होण्यासाठी योग्य ते नियोजन करून कृती करावी, 
1.6 प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध स्वरूपाच्या सुप्त क्षमता असतात, त्या सुप्त क्षमतांचा शोध घेण्यासाठी व त्यांचा विकास साधण्यासाठी विविध अध्ययन अनुभव व उपक्रम योजावेत, त्यातून साधल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्व विकासाचे वेळोवेळी मूल्यमापन करावे,
1.7 अतिरिक्त मुख्य पूरक मूल्यमापन,अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आकारिक मूल्यमापन करताना जे विद्यार्थी संपादणूक  मध्ये मागे असल्याचे आढळून येईल अशा विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी दृष्ट त्रुटींचा शोध घ्यावा व त्यानुसार वेळच्या वेळी विद्यार्थ्यांना वैयक्तिक अथवा गटात अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून त्यांना अपेक्षित संपादणूक पातळीपर्यंत आणावी.

मूल्यमापन बाबत अतिशय मोलाची माहिती , उपयुक्त व  महत्वपूर्ण तक्ता आवश्य पहा .इयत्ता निहाय, विषय निहाय भारांश तक्ता.
                                         

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .