आंतर जिल्हा बदली साठी विचारात घ्यावयाच्या महत्वाच्या बाबी क्र 1 ते 12 मुद्दे

       




आंतर जिल्हा बदली सुधारित धोरण 


आंतर जिल्हा बदली साठी विचारात घ्यावयाच्या महत्वाच्या बाबी क्र १ ते १२ मुद्दे 


                  शासनाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने  शासन निर्णय दि 24 एप्रिल 2017, शासन निर्णय दि 31 जुलै 2017, शासन निर्णय दि 20 ऑगस्ट 2019 अधिक्रमित करून आता जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठी या शासन निर्णयान्वये खालील प्रमाणे सुधारित  धोरण निश्चित करण्यात येत आहे.

1  महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा  सेवा प्रवेश नियम 1967 मधील 6.8 मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक देण्यास व बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यासही संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. 

2 आंतर जिल्हा बदलीसाठी विचारात घ्यावयाच्या बाबी

 2.1 ज्या शिक्षक कर्मचाऱ्याला आंतर जिल्हा बदली हवी आहे, अशा शिक्षकांची संबंधित जिल्हा परिषदेमध्ये त्या वर्षाच्या 31 मे अखेर किमान पाच वर्ष सलग सेवा होणे आवश्यक आहे. तसेच तो शिक्षक त्या पदावर कायम असणे आवश्यक आहे. या पाच वर्षाच्या कालावधीत संबंधित शिक्षकाच्या शिक्षण सेवक या पदावर असलेला कालावधी विचारात घेतला जाईल. विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग 2 मधील कर्मचाऱ्यांना सेवेची मर्यादा तीन वर्षाची असेल

2.2 आंतरजिल्हा बदली हा संबंधित शिक्षकांचा हक्क असणार नाही.

2.3 जे शिक्षक पदोन्नत झालेले आहेत अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदली हवी असल्यास संबंधित शिक्षकांनी तशी आंतर जिल्हा बदली मान्य झाल्यास स्वखुशीने पदावनत करण्याबाबत संमतीपत्र दिल्यानंतरच त्या शिक्षकांचा आंतरजिल्हा बदल्यांसाठी विचार केला जाईल.

 2.4 ज्या जिल्हा परिषदेचे रोस्टर बिंदुनामावली विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिली आहे अशा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची आंतर जिल्हा बदली होईल.

2.5 आंतर जिल्हा बदली प्रकरणात ज्या जिल्हा परिषदेचे रोस्टर बिंदुनामावली विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिली नाहीत अशा जिल्हा परिषदेमध्ये फक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली साखळी पद्धतीने होईल.

 2.6 यासंदर्भात आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांनी अर्ज करताना जास्तीत जास्त चार जिल्हा परिषदांची निवड करण्याची मुभा राहील याकरता त्यांनी सोबत जोडलेल्या परिशिष्ट मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. 

2.7 प्रत्येक वर्षी आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांनी शासनाद्वारे निर्देशित केलेल्या विशिष्ट कालावधीत संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. सदर अर्जाचा नमुना सोबतच्या परिषदांमध्ये जोडलेला आहे. या अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत. 

           "संबंधित शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली अनुसरून काही न्यायालयीन लोकायुक्त अन्यायाधिकरण यांचे स्वयं स्पष्ट आदेश असल्यास त्या त्या आदेशाची प्रत अर्ज लोकायुक्त अन्य न्यायाधिकरण यांचे स्वयम् पष्ट आदेश असल्यास त्या आदेशाची प्रत व अर्ज भरताना गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात यावी व त्यावर मूळ याचिकेची प्रत देखील उपलब्ध करून देण्यात यावी."

 2.8 सदरच्या बदल्या यापूर्वी निश्चित केलेल्या धोरणानुसार 10 टक्के पेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदांमधून  शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही. जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरता रिक्त पदांची टक्केवारी 10 टक्के पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. 

2.9 सदरची आंतरजिल्हा बदली संबंधित शिक्षकांच्या नियुक्ती प्रवर्गानुसार बदलीने जाण्याच्या जिल्हा परिषदेत रिक्त पद असल्यास त्या रिक्त पदावर बदली करण्यात येईल.

 3 न्यायालयीन आदेशाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद एकत्र करून पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवतील. ज्या आदेशाची अंमलबजावणी झालेली आहे अशा आदेशाच्या प्रती शासनास पाठवू नयेत. 

4 वरील प्रमाणे न्यायालयीन आदेशाबाबत सर्व कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंतर जिल्हा बदली ची प्रकरणे निकाली काढण्यात येतील. 

5 नवीन धोरणानुसार ना हरकत दाखल्याची आवश्यकता नसल्याने आंतर जिल्हा बदलीसाठी यापुढे जिल्हा परिषदांकडून नाहरकत दाखला देण्यात येणार नाही.

 6 आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेतून सामावून घेतलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता अशा बदली नंतर जिल्हा परिषदेत हजर झाल्याच्या दिनांकानुसार निश्चित करण्यात येईल. एका दिवशी एकापेक्षा अधिक शिक्षकांना सामावून घेताना त्यांची ज्येष्ठता त्यांच्या जन्मदिनांक नुसार ठरविण्यात यावी.

7 संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित अथवा चालू असल्यास सदर कर्मचारी आंतरजिल्हा बदली पात्र समजण्यात येईल.

8 ( प्राधान्यक्रम सविस्तर पोस्ट मध्ये वाचा ) 

उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक आठ प्रमाणे एकत्रित संवर्गनिहाय जेष्ठता सूची तयार झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे संवर्गनिहाय ज्येष्ठतेनुसार व विनंती प्रमाणे करण्यात येईल. ज्या शिक्षकांची बदली करायचे आहे. त्या शिक्षकाची बदली ज्या जिल्ह्यात होणे अपेक्षित आहे. त्या जिल्ह्यात त्या प्रवर्गासाठी बदली वर्षांमध्ये 31 मे अखेर बिंदुनामावली मधील सरळ सेवेची पद रिक्त असणे आवश्यक आहे. त्याच पदावर संबंधितांची बदली केली जाईल. कर्मचार्‍याने त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या जिल्ह्यात बिंदुनामावली प्रमाणे थेटपणे वा सकृद्दर्शनी पद उपलब्ध नसल्यास बदली करिता साखळी पद्धतीचा अवलंब करण्यात येईल व त्याद्वारे मागणी केलेल्या जिल्ह्यात उपलब्ध झालेस त्या पदावर संबंधित शिक्षकांची आंतरजिल्हा बदली केली जाईल. 
10 आंतरजिल्हा बदली विनंतीनुसार बदली असल्यामुळे यासाठी कोणती भत्ता व पदग्रहण अवधी कर्मचाऱ्यास अनुज्ञेय यांना होणार नाही. 
11 हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांक पर्यंत नियुक्ती आदेश निर्गमित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदली या शासन निर्णयातील तरतुदींचा मुळे बाधा पोहोचणार नाही.
12 आंतर जिल्हा बदली झाल्यानंतर संबंधित शिक्षकाने हजर झाल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.

अधिक माहितीसाठी खालील शासन निर्णय पहा व download करा.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. हे सगळं समजलं कृपया आता बदली प्रक्रिया सुरु होणार का नाही अन केव्हा सुरु होणार ते सांगा सर

    उत्तर द्याहटवा
  2. अंतर जिल्हा बदली कार्यमुक्त करण्यास विलंब करीत असल्यास काय करावे सर ?

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .