आंतर जिल्हा बदली, प्राधान्यक्रम व संवर्ग
आंतर जिल्हा बदली करिता राज्यातील सर्व जिल्हा परिषद तील इच्छुक शिक्षकांची राज्यस्तरावर प्रवर्गनिहाय संगणकीय पद्धतीने खालील प्राधान्यक्रम याप्रमाणे एकत्रित ज्येष्ठता सूची तयार करण्यात येईल.
8.1 ज्या शिक्षकांना एका जिल्हा परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले आहे असे शिक्षक
टीप : काही जिल्हा परिषदांनी भविष्यात संबंधित बिंदुनामावली मधील संबंधित बिंदू वरील पदे उपलब्ध होईल या अटीवर ना हरकत दाखले निर्गमित केले असून सदरचा शासन निर्णय बिंदुनामावली प्रमाणे आंतरजिल्हा बदली मान्य करीत असल्याने सदर ना हरकत दाखले प्राप्त केलेले शिक्षक या प्राधान्य क्रमात बसतील.
8.2 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1
या संवर्गात खालील शिक्षकांचा समावेश होईल.
क. पक्षाघाताने आजारी शिक्षक कर्मचारी (प्यारालीसीस)
ख. दिव्यांग कर्मचारी (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14-1-2011 मधील नमूद प्रारूप प्रमाणे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक) मानसिक विकलांग व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ) तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक
ग. हृदयशस्त्रक्रिया झालेले कर्मचारी
घ. जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी असलेले/ मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी/ डायलिसिस सुरू असलेले कर्मचारी
च. यकृत प्रत्यारोपण झालेले कर्मचारी शिक्षक
छ. कॅन्सरने कर्करोग आजारी कर्मचारी
ज. मेंदूचा आजार झालेले कर्मचारी
झ. थालेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसूत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार व इतर आजार (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ)
ट. माजी सैनिक तसेच आजी माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी/ विधवा
ठ. विधवा कर्मचारी
ड. कुमारिका
ढ. शिक्षक परितक्त्या घटस्फोटीत महिला कर्मचारी
प. वयाने 53 वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी
फ. स्वातंत्र्यसैनिकांचा मुलगा मुलगी नातू/नात ( स्वातंत्र्यसैनिक हयात असेपर्यंत)
वरील एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास बदलीसाठी त्यांच्या सेवाजेष्ठता प्रमाणे ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल. तसेच वरील प्रमाणे कार्यवाही करताना दोघांची सेवाज्येष्ठता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचार्यांच्या प्राधान्याने विचार करावयाचा आहे. अशा प्रकरणात जन्मदिनांक देखील एक असल्यास इंग्रजी आद्याक्षरा प्रमाणे आडनाव प्रथम येईल. अशा शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात यावी.
8.3 विशेष संवर्ग शिक्षक भाग-2 पती-पत्नी एकत्रीकरण
जर सध्या पती पत्नी यांच्या नियुक्तीचे ठिकाण दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात असल्यास अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल. पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत संबंधित दाम्पत्याला पैकी एकाने त्याचा जोडीदार ज्या जिल्ह्यात कार्यरत असेल त्या जिल्ह्यात बदली मिळण्यासाठी अर्ज करायचा आहे. दोघांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. याविषयी संवर्ग अंतर्गत अर्ज करताना दोघांनाही ते कार्यरत असलेल्या जिल्ह्यापेक्षा अन्य जिल्ह्यात बदली हवी असल्यास पती-पत्नीची जोडी एक युनिट म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्या दोघांपैकी सेवाजेष्ठता ग्राह्य न धरता सेवेने कनिष्ठ असलेल्या जोडीदाराची सेवाजेष्ठता ग्राह्य धरण्यात येईल व दोघे कार्यरत असलेल्या जिल्ह्यापेक्षा एकत्रित मागणी केलेल्या अन्य जिल्ह्यात त्यांचे निवड प्रवर्गानुसार बिंदू रिक्त असल्यास प्राधान्य मिळेल. पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत असणारी वर्गवारी खालील प्रमाणे आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या बदलीचा प्राधान्यक्रम हे याच क्रमवारीनुसार राहील.
क. पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर
ख. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर
ग. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर
घ. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्यशासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी
असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका /नगरपालिका
च. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी
छ. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा अनुदानित संस्थेतील कर्मचारी असेल तर
वरील एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास बदलीसाठी त्यांच्या सेवाजेष्ठता प्रमाणे ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल. तसेच वरील प्रमाणे कार्यवाही करताना दोघांची सेवाज्येष्ठता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचार्याचा प्राधान्याने विचार करावयाचा आहे. अशा प्रकरणात जन्म दिनांक ही एक असल्यास इंग्रजी अध्याक्षरा प्रमाणे आडनाव प्रथम येईल. अशा शिक्षकांना प्राधान्यक्रम देण्यात येईल. वरील प्रमाणे विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांचे अर्ज विचारात घेताना त्यापैकी 60 टक्के अर्ज ज्येष्ठतेनुसार प्राधान्याचा देऊन विचारात घेण्यात येतील व उर्वरित 40 टक्के सर्वसाधारण संवर्गातील अर्ज म्हणून विचारात घेण्यात येतील.
8.4 सर्वसाधारण संवर्ग
त्यानंतर सर्वसाधारण अर्जदाराची आंतरजिल्हा बदलीसाठी जेष्ठता त्यांच्या सेवाजेष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात येईल. वरील प्रमाणे जेष्ठता दिल्यानंतर सर्वसाधारण संवर्गातील अर्जदारांची सेवाजेष्ठता विचारात घेण्यात येईल. येथील सेवाजेष्ठता दिनांक एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच जन्मदिनांक एकच असल्यास इंग्रजी आद्याक्षर प्रमाणे आडनाव विचारात घेऊन जी अध्याक्षर प्रथम येते. त्याप्रमाणे प्राधान्यक्रम प्रदान करण्यात येईल.
बदल्या या निवड प्रवर्गानुसार व्हावात
उत्तर द्याहटवाCan you please guide me how and where to apply for " NOC( Na harkat praman patra )" In case of inter-district transfer?
उत्तर द्याहटवाआंतरजिल्हा बदलीमघ्ये दोघेही वेगवेगळ्या जिल्हा परिषद मध्ये सेवेत आहेत.पतीची सेवा जास्त आहे.पत्नी शिक्षणसेवक आहे.पतीला पत्नीच्या जिल्ह्यामघ्ये बदली करुन घ्यायची असेल तर .पत्नी शिक्षणसेवक असल्याने पती पत्नी एकत्रिकरण प्रवर्गातून अर्ज भरता येतो का
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .