इयत्ता पहिली दाखल प्रवेश वय सन २०२2-२०२3
इयत्ता पहिलीसाठी किमान व कमाल वयोमर्यादाबाबत अत्यंत महत्वाचे तथा खात्रीशीर व अभ्यासपूर्ण माहिती....!!!
किमान व कमाल वयोमर्यादा 202३-24 ,इयत्ता 1 ली प्रवेश
मा.शिक्षण संचालक (प्रा.) यांच्या दिनांक 28.02.2022 च्या RTE 25 % प्रवेशाबाबतच्या पत्रानंतर शिक्षक बांधवांमध्ये इ. 1 ली प्रवेशाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली. वास्तविक पाहता मा.शिक्षण संचालक (प्रा.) यांनी दिनांक 03.03.2022 च्या सुधारित पत्राद्वारे याबाबतची संभ्रमावस्था दूर करून हे पत्र फक्त RTE 25 % प्रवेशाबाबत असल्याचे स्पष्ट केले आहे.
इ.1 ली प्रवेशाबाबत शासन निर्णय दिनांक 11.06.2010 नुसार कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. यानुसार शाळा प्रवेशासाठी बालकाची वयोमर्यादा 6 वर्षे निश्चित करण्यात आली होती.परंतु 5 वर्षे वय पूर्ण झालेले बालकही प्रवेशास पात्र असतील असे नमूद केले होते.
त्यानंतर शासन निर्णय दिनांक 21.01.2015 व शासन शुद्धीपत्रक दिनांक 23.01.2015 नुसार बालकाचे शाळा प्रवेशाचे वय हे 6 वर्षे निश्चित करण्यात आले व त्यासाठी 31 जुलै हा मानिव दिनांक निश्चित करण्यात आला.
त्यानंतर शासन निर्णय दिनांक 25.01.2017 नुसार 6 वर्षे वय निश्चित करण्यासाठी मानिव दिनांक दुरुस्त करून तो 30 सप्टेंबर असा निश्चित करण्यात आला.
शासन निर्णय दिनांक 25.07.2019 नुसार मानिव दिनांकामध्ये आणखी 15 दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले. म्हणजेच 2020-21 या शैक्षणिक वर्षापर्यंत आपण 15 ऑक्टोबर या दिनांकापर्यंत 6 वर्षे पूर्ण करणाऱ्या बालकांना इ.1 ली मध्ये प्रवेश देऊ शकत होतो.
परंतु या निर्णयात बदल होण्यासाठी राज्यातील पालकांचा आग्रह होता. या लोकभावनेचा विचार करून शासनाने दिनांक 18.09.2020 रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित केला असून शाळा प्रवेशासाठी 6 वर्षे वय पूर्ण होण्यासाठीचा मानिव दिनांक 31 डिसेंबर असा करण्यात आला आहे. यानुसार आता 31 डिसेंबर पर्यंत 6 वर्षे वय पूर्ण करणाऱ्या बालकांना आपण जून महिन्यात इ.1 ली मध्ये प्रवेश देऊ शकतो.
दिनांक 18.09.2020 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी 2021-22 या शैक्षणिक वर्षापासूनच सुरु करण्यात आली आहे.
येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजे जून 2022 मध्ये इ.1 ली मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बालकाची जन्मतारीख ही 6 वर्षे पूर्ण होण्यासाठी 31.12.2016 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.
वरील शासन निर्णयांमध्ये बालकाच्या इयत्ता पहिली प्रवेशाबाबत किमान वयोमर्यादा निश्चित केलेली असली तरी कमाल वयोमर्यादा मात्र सांगितलेली नाही.
याबाबत मा.शिक्षण संचालक (प्रा.) यांनी दिनांक 20.12.2021 च्या पत्राद्वारे मार्गदर्शन केले आहे.
त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्यासाठी बालकाची जन्मतारीख "01.10.2015 ते 31.12.2016" या कालावधीतील असावी.
मा. शिक्षण संचालक (प्रा.) यांचे दिनांक 03.03.2022 चे पत्र वाचून "इयत्ता पहिली प्रवेशासाठी बालकाचे 7 वर्षे वय पूर्ण असावे" असा कोणताही गैरसमज करून घेऊ नये. हे पत्र फक्त 25% RTE प्रवेशासाठी लागू असून त्यातील 7 वर्षे 5 महिने 30 दिवस ही 'किमान' वयोमर्यादा नसून 'कमाल' वयोमर्यादा आहे.
इतर सर्व सर्वसाधारण बालकांच्या इयत्ता पहिली प्रवेशासाठी मा.शिक्षण संचालक (प्रा.) यांच्या दिनांक 20.12.2021 च्या पत्राचा संदर्भ घ्यावा. या पत्रानुसार "01.10.2015 ते 31.12.2016" या कालावधीतील जन्मतारीख असलेल्या बालकांना आपण जून 2022 मध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देऊ शकतो.
30 सप्टेंबर 2015 व त्यापूर्वीची जन्मतारीख असलेल्या बालकांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे याबाबत लवचिकता ठेवावी किंवा अशा बालकांना वयानुसार इयत्ता दुसरीमध्ये प्रवेश देणे योग्य होईल.
श्री.दत्ता पाटील,बार्शी
मो. नं. 9421874085
(या संदर्भात मागे आलेले सर्व GR पाहण्याकरिता येथे click करा.)
इयत्ता पहिलीसाठी किमान व कमाल वयोमर्यादाबाबत अत्यंत महत्वाचे व लेटेस्ट , सध्या लागू असलेले खालील परिपत्रक पहा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .