राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२


 राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ 

                 दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी सर सी. व्ही. रामन यांच्या रामन परिणाम या संशोधन कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन 2022 साजरा करण्यासाठी या वर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टिकोन हा विषय निश्चित केला असून त्या अनुषंगाने विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात संबंधित माहिती व समस्या याबाबत शास्त्रीय माहितीचा प्रसार करणे.वैज्ञानिक  दृष्टिकोन विकसित करणे. विज्ञान विषयाबाबत अभिरुची विकसित करणे. या हेतूने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचे साठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्तर निहाय  शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने 21 ते 28 फेब्रुवारी २०२२  या कालावधीत घेण्यात येणार आहेत. खालील तक्त्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचे साठी शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा कार्यक्रमाचा दोन ते तीन मिनिटात पर्यंतचा सुस्पष्ट व्हिडिओ, फोटो व इतर साहित्य फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर इत्यादी समाज संपर्क माध्यमांवर #scienceday2022,#nationalscienceday2022 या #tag वापर करून पोस्ट अपलोड करावा. आपण समाज संपर्क माध्यमांवर अपलोड केलेल्या पोस्ट  https://scertmaha.ac.in/competitions/ या लिंक वर नोंद घेण्यात यावी. उत्कृष्ट उपक्रमास राज्य स्तरावरून प्रसिद्धी देण्यात येणार आहे .

               शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करावयाचे उपक्रम

इयत्ता पहिली ते पाचवी
1 चित्रकला    ,2 पोस्ट निर्मिती 
विषय 
1 माझी पृथ्वी- 
2 परिसरातील माझे मित्र सोबती
 ( चित्रकला पोस्टर निर्मिती : दिलेल्या दोन विषयांपैकी कोणत्याही विषयावर चित्र/पोस्टर काढून त्याचा फोटो अपलोड करावा.)

  इयत्ता सहावी ते आठवी 
1 निबंध लेखन
2 वैज्ञानिक रांगोळ्या 
विषय 
1 स्वयंपाक घरातील विज्ञान 
2 भविष्यातील दळणवळण 
3 माझी शाश्वत जीवनशैली 
4 विज्ञानातील संकल्पना
 (निबंध लेखन: दिलेल्या विषयावर कोणत्याही विषयावर एक हजार शब्दांपर्यंत निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा.वैज्ञानिक रांगोळी : दिलेल्या विज्ञानातील संकल्पना या विषयावर रांगोळी काढून त्याचा फोटो अपलोड करावा.) 

इयत्ता नववी व अकरावी 
1 निबंध लेखन
2 फोटोग्राफी / व्हिडिओ निर्मिती 
विषय 
1 माझा आवडता संशोधक
2 भविष्यवेधी विज्ञान सफर 
3 विज्ञानातील गमती जमती जैवविविधता 
5 विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन 
(निबंध लेखन दिलेल्या कोणत्याही विषयावर एक हजार शब्दात निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा. फोटोग्राफी/व्हिडीओ निर्मितीतील दिलेल्या कोणत्याही विषयावर तीन मिनिटांचा व्हिडिओ तयार करून अपलोड करावा.)

  प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक आणि विद्यार्थी 
1 वैज्ञानिक प्रतिकृती निर्मिती 
2 वैज्ञानिक खेळणी निर्मिती 
विषय 
1 समाजोपयोगी विज्ञान 
2 शाश्वत विकास 
वैज्ञानिक प्रतिकृती वैज्ञानिक खेळणी निर्मिती
 (दिलेल्या कोणत्याही विषयावर वैज्ञानिक प्रतिकृती किंवा वैज्ञानिक खेळणी तयार करून त्याचा दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ तयार करावा. वैज्ञानिक प्रतिकृतींची माहिती लिहून त्याचा फोटो आणि व्हिडिओ अपलोड करावा.)
            सदर उपक्रमांचे आयोजन करताना covid-19 च्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर पाहणे. स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षक यांनी वरील नमूद करण्यात आलेल्या ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी शाळा शिक्षक पालक यांना अवगत करण्यात यावी. अधिकाधिक विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये सहभागी होतील यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी.

अधिक माहिती खालील परिपत्रकात पहा किंवा download करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.