जिल्हांतर्गत बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतच्या तक्रारीच्या प्रक्रीयेबाबत बाबत (५.१० )
बदली प्रकिया पार पडल्यानंतर कोणत्या शिक्षकाला कोणती शाळा मिळाली याची चर्चा होते व यातूनच एखाद्याच्या जागेवर एखादा शिक्षक आला कि त्याची चौकशी केली, कुणाला कोणती शाळा मिळाली याची माहिती काढली जाते.जर काही चुकीचे,अनियमित झाले असेल असे वाटत असेल तर त्याची तक्रार केली जाते .आपण बदली मधील अनियमितता व तक्रारीबाबत जिल्हांतर्गत बदली नवीन शासननिर्णयाला अनुसरून सविस्तर समजावून घेवू.
5.10.1 संगणकीय प्रणालीद्वारे निर्गमित झालेल्या आदेशाच्या विरोधात बदलीच्या अनियमिततेबाबत तक्रार असल्यास त्याचा निपटारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर झाल्यास संबंधित शिक्षकांना जिल्हा परिषद स्तरावरच सत्वर न्याय मिळू शकतो. यासाठी जिल्हांतर्गत बदली मध्ये शिक्षकांची तक्रार असल्यास सदर तक्रारीची चौकशी करून निवारण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर एक समिती गठीत करण्यात येईल , सदर समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग, शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचा समावेश असेल. बदलीचे आदेश प्राप्त झाल्यास असून संबंधित शिक्षकांनी सात दिवसाच्या आत बदलीबाबत तक्रार असल्यास या समितीकडे तक्रार अर्ज दाखल करावा. तक्रारीच्या संबंधात समितीने चौकशी करून 30 दिवसांच्या आत निर्णय घेण्यात यावा, परंतु बदली बाबतची तक्रार तपासत असताना गैरसोयीची नियुक्ती म्हणजे बदल्यांमधील अनियमितता नव्हे असे प्रामुख्याने स्पष्ट करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत घोषित करण्यात आलेल्या अनिवार्य रिक्त जागेवर शिक्षकांची समुपदेशनाने नियुक्ती करता येणार नाही, कारण समानीकरणाचे धोरण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी आवश्यक आहे.
5.10.2 मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने घेतलेल्या निर्णयाचे समाधान न झाल्यास संबंधित शिक्षक बदलीच्या निमित्ताने बाबत विभागीय आयुक्तांकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश प्राप्त झाल्यापासून 7 दिवसाच्या आत दाद मागू शकतात. अशा पद्धतीने विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल झालेल्या अपील वजा तक्रारीवर शक्यतो, तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील 30 दिवसांचे आत विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यावयाचा आहे. विभागीय आयुक्तांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील.
5.10.3 वरील प्रमाणे बदलीच्या आदेशाच्या विरुद्ध अपिलीय प्रक्रिया सुरू असताना जर शैक्षणिक वर्ष आरंभ झाले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अपिलीय प्रक्रियेला बाधा न येता व शिक्षकांची अपिलीय अधिकार अबाधित ठेवून शिक्षकांना त्यांना नेमून दिलेल्या पदस्थापना वर हजर होऊन शैक्षणिक कर्तव्य बजावणे बंधनकारक राहील.
5.10.4 संवर्ग भाग एक व संवर्ग भाग दोन मध्ये ज्या शिक्षकांनी अर्ज भरून बदली करून घेतली आहे, ज्या शिक्षकांबद्दल तक्रारी प्राप्त झालेले आहेत अशा शिक्षकांची बदली च्या संबंधित संवर्गाच्या कागदपत्रांची तात्काळ पडताळणी करण्यात यावी ही पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात येईल .
5.10.5 अशी पडताळणी करताना एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतलेली आहे अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावित करावी.
अंतर जिल्हा बदली बाबत माहिती मिळावी
उत्तर द्याहटवामी अगोदर अवघड क्षेत्रात होते.ती शाळा आता सुगम झाली आहे माझी आता सुगम क्षेत्रात 7 वर्षे पूर्ण झाली आहेत मग मी बदली पात्र आहे का
उत्तर द्याहटवासर्व मुख्याध्यापक हे 53 प्लस असतात त्यामुळे बहुतांश मुख्याध्यापक हे सोयीने असतात त्यामुळे ते बदली पात्र असले तरीही बदलीच नकार देऊ शकतो आणि नकार देतातही त्यामुळे मुख्याध्यापकांना बदली प्रक्रियेत 3 वर्षाचीवर्ष तीन ची आठ नसावी तसेच त्यांच्यासाठी सर्व जागा दाखवण्यात यावे प्रत्यक्षात दिव्यांग असून देखील अनेक मुख्याध्यापकांना बदलीचा लाभ घेता आलेला नाही आणि मी आजपर्यंत ऑनलाईन बदलीचा लाभ घेतलेला नसून देखील प्रमोशननी सध्याच्या शाळेत मला तीन वर्षे पूर्ण झालेले नाहीत त्यामुळे मी बदली पासून वंचित असून संवर्ग चार मधील व दोन मधील धंदा कट शिक्षकांना त्यांना गावी मिळतात मात्र आम्ही दिव्यांग असून देखील आम्हाला आमच्या सोयीने गाव मिळालेले नाही याबाबत थोडासा विचार व्हावा ही नम्र विनंती
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .