भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव-विविध स्पर्धा व उपक्रम

 


भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रम 

                भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 12 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2023 या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत जिल्हा स्तरावर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येईल, असे परिपत्रक काढून निर्देश कार्यालयास देण्यात आलेले आहेत. हा अमृतमहोत्सव भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, नावीन्यपूर्ण कल्पना, नवे संकल्प, स्वातंत्रोत्तर फलनिष्पत्ती, अंबलबजावणी, या बाबींचा विचार करून विविध शैक्षणिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, छात्राध्यापक, अध्यापक, विद्यालयाचे प्राचार्य, अध्यापक, आचार्य आणि क्षेत्रीय अधिकारी यांनी जिल्हा स्तरावर आयोजित या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राज्याच्या पर्यटन व संस्कृती विभागाच्या वतीने करण्यात आले आहे , या बाबींचा विचार करता पुढील मार्गदर्शक सूचनांनुसार विविध स्पर्धांच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे .
                
  विविध उपक्रमांचे / स्पर्धांचे माहेवर नियोजन 

  नोव्हेंबर 21 
 निबंध स्पर्धा
सहावी ते आठवी 
माझा आवडता क्रांतिकारक, मी तिरंगा बोलतोय, मी अनुभवलेला स्वातंत्रदिन,
 इयत्ता नववी ते बारावी
 स्वातंत्र्यानंतरचा नवभारत, 21 व्या शतकातील देशासमोरील आव्हाने व उपाय, भारताचे संविधान, नागरिकांची कर्तव्य व जबाबदारी,
 छात्राध्यापक डीएल एड 
स्वातंत्र्या नंतर शिक्षणातील बदल, 21 व्या शतकातील भारतीय शिक्षण आव्हाने व अपेक्षा,
शिक्षक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, 21 व्या शतकातील भारतीय शिक्षण आव्हाने व अपेक्षा 
अध्यापक आचार्य स्वातंत्रोत्तर काळातील शिक्षक व शिक्षणातील बदल, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020

डिसेंबर 21
रांगोळी स्पर्धा,
इयत्ता सहावी ते आठवी, इयत्ता नववी ते बारावी,
 स्वतंत्र भारत
 छात्राध्यापक 
भारतीय संस्कृती

जानेवारी 22
समूहगीत स्पर्धा 
इयत्ता पहिली ते पाचवी, इयत्ता 6 वी ते 12 वी, छात्राध्यापक 
देशभक्ती /राष्ट्रभक्ती/ एकता/ सर्वधर्मसमभाव गीत

फेब्रुवारी 22 
एकल गीत स्पर्धा
 इयत्ता पाचवी ते आठवी ,इयत्ता नववी ते बारावी, छात्र अध्यापक 
  देशभक्ती /राष्ट्रभक्ती/ एकता/ सर्वधर्मसमभाव गीत

मार्च 22 
पथनाट्य स्पर्धा 
इयत्ता आठवी ते बारावी व d.l.ed छात्राध्यापक 
देशभक्ती, सामाजिक जाणीव व जागृती 

एप्रिल 22 
एकपात्री भूमिका अभिनय स्पर्धा 
इयत्ता सहावी ते आठवी, इयत्ता नववी ते बारावी, छात्र अध्यापक  
मी एक क्रांतिकारक, मी भारतीय सैनिक, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान दिलेल्या व्यक्ती, समाज सुधारक 

जुलै 22 
पोस्टर स्पर्धा सहावी ते आठवी नववी ते बारावी व छात्राध्यापक स्वातंत्र्य दिन पारंपारिक सण स्वातंत्र्य उत्तर भारत स्वातंत्र्य संग्राम

ऑगस्ट 22 
वक्तृत्व स्पर्धा 
इयत्ता तीसरी ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववी ते बारावी व डीएलएड छात्राध्यापक 
माझी समाजसेवा, माझी देश सेवा, ऐतिहासिक थोर नेता, सर्व समूह सर्वधर्मसमभाव ,वैविध्यपूर्ण भारत, स्वदेशी ते आत्मनिर्भर भारत, भारत देशाचे नवनिर्माण

ऑगस्ट 22
कथा लेखन स्पर्धा 
इयत्ता आठवी ते बारावी, छात्राध्यापक 
भारतीय स्वातंत्र्य लढा

सप्टेंबर 22
कविता लेखन स्पर्धा आठवी ते बारावी व d.el.ed छात्राध्यापक भारतीय स्वातंत्र्य लढा

ऑक्टोंबर 22
वेशभूषा स्पर्धा इयत्ता पाचवी ते बारावी व d.el.ed छात्राध्यापक भारतीय

 नोव्हेंबर 22
सर्वोत्तम घोषणा स्पर्धा
 इयत्ता पाचवी ते बारावी व डीएलएड छात्राध्यापक 
भारताची प्रगती, मेरा भारत महान 

डिसेंबर 22 
ऑनलाइन वेबिनार आयोजन शिक्षक क्षेत्रीय अधिकारी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य अध्यापक आचार्य भारतीय स्वातंत्र्याचा लढा

जानेवारी 23 
नजीकच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी 
डीएड अध्यापक छात्राध्यापक शिक्षक क्षेत्रीय अधिकारी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक प्राचार्य शिक्षक क्षेत्रीय अधिकारी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक आचार्य ऐतिहासिक स्थळांना भेटी

फेब्रुवारी 23 
वर्ग स्पर्धा 
इयत्ता पाचवी ते बारावी व डीएड छात्राध्यापक 

मार्च 23 
शैक्षणिक साहित्य निर्मिती 
प्राचार्य प्राध्यापक छात्राध्यापक शिक्षक क्षेत्रीय स्वातंत्र्याची संबंधित विविध ऐतिहासिक घटना अध्ययन व अध्यापन 

एप्रिल 23 
सामान्यज्ञान स्पर्धा अथवा प्रश्नमंजुषा
इयत्ता पाचवी ते बारावी व छात्राध्यापक 
भारतीय स्वातंत्र्याचा लढा ,स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेले क्रांतिकारक, समाज सुधारक 

मे 23 
आनंद मेळावा 
इयत्ता पाचवी ते बारावी व डीएड
 विविध राज्यातील संस्कृती विविधतेतून एकता दर्शवणारे विविध स्टॉल्स विद्यार्थी यांनी या मेळाव्यात उभारावे

जून 23 
चित्रकला स्पर्धा
 इयत्ता पाचवी ते बारावी व डीएलएड छात्राध्यापक 
भारतीय स्वातंत्र्यलढा स्वदेशी ते आत्मनिर्भर भारत, भारत देशाचे नवनिर्माण 

जुलै 23
पुस्तक परिषद स्पर्धा 
इयत्ता दहावी ते बारावी 
माझी देश, सेवा सर्व धर्म समभाव व वैविध्यपूर्ण भारत, स्वदेशी ते आत्मनिर्भर भारत ,भारत देशाचे नवनिर्माण, भारतीय स्वातंत्र्यलढा, भारतीय समाजसुधारक व क्रांतिकारक यासंदर्भात पुस्तकांचे वाचन करून आत्म परीक्षण करणे. 

ऑगस्ट 23
प्रभात फेरी 
पहिली ते बारावी
 भारतीय स्वातंत्र्यलढा, स्वदेशी ते आत्मनिर्भर भारत, भारत देशाचे नवनिर्माण

              समन्वय अधिकारी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत वेळापत्रकातील स्पर्धांची दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करावी. यासंदर्भात आपल्या अधिनस्त तालुकास्तरावरील क्षेत्रीय अधिकारी यांना आदेशित करावे. या संदर्भात आवशक्य पत्रव्यवहार करावा. तसेच सदर पत्राची प्रतिलिपी प्रस्तुत कार्यालयात मेलवर पाठविण्यात यावी. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर विषय साधन व्यक्ती यांची मदत घेण्यात यावी. जिल्हा समन्वय अधिकारी यांनी सर्व तालुक्यातून राबवलेल्या उपक्रमाचा अहवाल संबंधित विषय साधन व्यक्ती यांचेकडून जिल्हास्तर यावर  संकलित करावा आणि हा संकलित अहवाल  लिंक वर दर महा महिनाअखेरीस भरण्यात यावा. दर महा अहवाल नियमितपणे भरण्याची जबाबदारी डायट जिल्हा समन्वय अधिकारी यांची असेल. सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा या स्पर्धा व उपक्रमात सहभाग घेऊ शकतात तसेच वेळापत्रकातील स्पर्धा नियोजित महिन्याच्या कोणत्याही तारखेला घेण्याचे स्वातंत्र्य जिल्हा समन्वयक अधिकारी यांना असेल मात्र सदर स्पर्धांची अंमलबजावणी करत असताना दैनंदिन शालेय कामकाजात व्यत्यय येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा व उपक्रमांची समाज माध्यमांद्वारे तसे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम व्हाट्सअप याद्वारे व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात यावी. या पोस्टची लिंक अहवाल लेखनात नमूद करावी.


भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रम खालील परिपत्रकात सविस्तर पाहू शकता.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .