वाई मधील विठ्ठलराव जगताप नगरपालिका शाळा क्र पाच चे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश




 वाई मधील विठ्ठलराव जगताप नगरपालिका शाळा क्र ५ चे  शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश


वाई दि १८  : (प्रतिनिधी)

               वाई शहरातील विठ्ठलराव जगताप नगरपालिका शाळा क्रमांक पाच मधील अकरा विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये झळकले.पाचवी शिष्यवृत्ती च्या राज्य  गुणवत्ता यादी सह जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये या शाळेचे तब्बल ११ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले .
              दरवर्षीप्रमाणे शाळेची परंपरा कायम ठेवत शहरी विभागातून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्वामी शशिकांत क्षीरसागर  हा राज्यात अकरावा वा तर जिल्ह्यात पंधरावा, तसेच ओम  शिंदे जिल्ह्यात  27 वा ,श्लोक  नवघणे जिल्ह्यात 41वा, प्रज्ञा  वाडकर जिल्ह्यात 51 वी, श्रीराज  डोईफोडे जिल्ह्यात 114 वा, शर्वरी जोशी जिल्ह्यात 127 वी, प्रज्वल घागरे जिल्ह्यात 130 वी व श्रावणी रासकर जिल्ह्यात 134 वी, तन्मय  माने जिल्ह्यात 158 वा, वेदांत  भिलारे जिल्ह्यात 188 वा, हर्षवर्धन  धायगुडे जिल्ह्यात 195 वा अशा विद्यार्थ्यांनी यंदा शिष्यवृत्ती परीक्षेत उतुंग यश मिळविले. अशा प्रकारे गेल्या बारा वर्षात एकूण 146 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. त्यापैकी दहा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत.  शाळेच्या मुख्याध्यापिका  कांताबाई खडसरे,तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका जयश्री क्षीरसागर, मंगल अडसुळे, मीनाक्षी राठोड, , माधवी भुतकर, यांनी यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
            आमदार मकरंद पाटील, गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, नगराध्यक्ष अनिल सावंत, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे, प्रशासनाधिकारी साईनाथ वाळेकर, तसेच विकास जाधव, दिलीप पवार, नगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निर्मला चोरगे,सदस्य प्रदीप चोरगे, नगरसेवक चरण गायकवाड, रुपाली वनारसे, शीतल शिंदे, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ, वाई नगरपालिका क्षेत्रातील मान्यवरांनी शिष्यवृत्तीधारक शिलेदारांची खूप खूप कौतुक व अभिनंदन केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वाई परिसरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .