शाळेचे ध्वजारोहण कुणी करावे ? याबाबत महत्वाचे , शाळेचा झेंडा कुणी फडकवावा ?

 जिल्हा परिषदेच्या  शाळेचे  ध्वजारोहण कुणी करावे या बाबत महत्वाचे, 

शाळेचा झेंडा कुणी फडकवावा ?



GR Download Link 

coming soon.....

You have to wait 20 seconds.


        सविस्तर वाचा.....         

       महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी शि. सो. झणके यांनी दिनांक 12. 8. 2005 या दिवशी  सर्व विभागांचे  विभागीय आयुक्त व सर्व जिल्हा परिषदांचे  मुख्य कार्यकारी अधिकारी  यांना परिपत्रक काढून सूचना दिलेल्या आहेत . या दिलेल्या पत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन कुणी करावे  याबाबत स्पष्ठ  सूचना दिलेल्या आहेत . या पत्रा मध्ये  संदर्भ क्रमांक १ ला  शासनाचे पत्र दिनांक 15. 3. 2004 दिलेले आहे.  तसेच  संदर्भ क्रमांक 2 ला माहितीच्या अधिकार नियम 2002 च्या अर्जाचा उल्लेख केला आहे .

            या परिपत्रकामध्ये स्पष्ठ सांगितले आहे कि सदर  संदर्भ १ च्या  परिपत्रकामध्ये  जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन कुणी करावे याबाबतचे आदेश दिलेले आहेत. वरील संदर्भाधिन पत्र क्रमांक 1 अन्वये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये झेंडावंदन कुणी करावे याबाबत सर्व जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आलेल्या होत्या तथापि संदर्भातील पत्र क्रमांक दोन च्या संदर्भात पुनश्च कळविण्यात येते की केंद्र शासनाच्या गृह मंत्रालया मार्फत राष्ट्रीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रसंगी कशाप्रकारे ध्वजारोहण करण्यात यावे याबाबतच्या सूचना प्राप्त होत असतात. त्याप्रमाणे राज्यात ध्वजारोहणाचे कार्यक्रम साजरे करण्यात येतात. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार मुंबईत माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री तसेच जिल्हास्तरावर त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री तालुकास्तरावर तहसीलदार व प्रांताधिकारी व शाळांमधून शाळांचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण होते. कृपया या प्रमाणे कार्यवाही करावी असा स्पष्ट उल्लेख माननीय कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन शि. सो. झणके   यांनी आदेश दिलेले आहेत.


या संदर्भात कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन शि. सो. झणके यांचे परिपत्रक वाचा व download करा.

(या संदर्भात नवीन परिपत्रक आले असल्यास संपर्क करणे )



टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक कि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष या करता मार्गदर्शन

    उत्तर द्याहटवा
  2. आपला देशात संविधान मानले जाते संविधाना नुसार ज्याचे कर्तव्य आहे त्याने ते पर पाडले संविधान पेक्षा कोणी मोठा नाही

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .