शाळा सुरु करणेबाबत मार्गदर्शक सूचना

 


 शाळा सुरु करणेबाबत मार्गदर्शक सूचना 


           नुकताच शासनाचे शाळा सुरु करण्याबाबत शासननिर्णय पारित केलेला आहे. त्यानुसारच शाळा सुरु करावयाच्या आहेत .त्यासाठी शाळा सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्या नंतरच्या  मार्गदर्शक सुचना देखील शासनाने दिल्या आहेत. मार्गदर्शक सूचना आपण सविस्तर पाहूयात.

(परिशिष्ट अ) 
शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत च्या मार्गदर्शक सूचना

1 शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा निश्चित करणे. 

२ शिक्षकांची covid-19 बाबत ची चाचणी करणे.

३ बैठक व्यवस्था:
वर्ग खोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर फिजिकल डिस्टन्स  च्या नियमानुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे बैठक व्यवस्था असावी. बैठक व्यवस्थेमध्ये दोन विद्यार्थ्यांनी दरम्यान सुरक्षित अंतर असावे. विद्यार्थ्यांचे मास्क ने पूर्णत झाकलेले असले पाहिजे. याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे.
 
४ शारीरिक अंतर फिजिकल डिस्टन्स  च्या नियमांच्या अंमलबजावणी करताना विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे.
 
५ शाळेतील कार्यक्रम आयोजना वरील निर्बंध घालणे.
 परिपाठ, स्नेहसंमेलन व इतर तत्सम कार्यक्रम यामुळे अधिक गर्दी होऊ शकते, अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनात  कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात.
६ पालकांची संमती व पालकांनी घ्यावयाची काळजी. 

७ विद्यार्थी पालक शिक्षक व समाजातील सदस्य यांना covid-19 च्या संदर्भातील आव्हाने व त्याबाबतची त्यांची भूमिका याबाबत जागृत करावे. 

८ शाळेतील उपस्थिती बाबतच्या धोरणांमध्ये सुधारणा करणे.
 विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्ण पालकांच्या संमती वर अवलंबून असेल. 100% उपस्थितीबाबत देण्यात येणारी पारितोषिके covid-19 परिस्थितीमुळे सद्यस्थितीत देऊ नयेत भविष्यामध्ये परिस्थिती सुधारल्यानंतर नेहमीच शाळा सुरू झाल्यानंतर अशी पारितोषिके देता येतील.

 ९ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे.
 शाळा सुरू करण्यापूर्वी त्या शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणीबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करणे.



(परिशिष्ट ब)
 शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना बाबतच्या मार्गदर्शक सूचना 

 १ शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे. 

२ शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे. 

३ प्रत्येक शाळेमध्ये वैद्यकीय मदत कक्ष सुरू ठेवणे.

४ विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय करणे.
 100% लसीकरण झालेल्या वाहन चालक व मदतनीस यांची सेवा घ्यावी. दोन लस घेतले नसलेल्या वाहनचालक व मदतनिसांना सेवेमध्ये घेऊ नये.

५ कर्मचारी व विद्यार्थी यांचा सुरक्षित प्रवेश व गमन 
दर दिवशीच्या दोन सत्रांच्या  मध्ये योग्य तो कालावधी देण्यात यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये योग्य ते शारीरिक अंतर राखणे शक्य होईल. शाळेची एकापेक्षा अधिक प्रवेशद्वार असल्यास शाळेत येताना व जाताना सर्व प्रवेशद्वारांना वापर करावा. कुटुंबातील एखादा सदस्य ताप, खोकला यांनी आजारी असल्यास आपल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. 

६ वर्गखोली व इतर ठिकाणी सुरक्षेच्या मानकांची खात्री करणे.
  पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक शक्यतो घेऊ नये.
 
७ अभ्यास वर्गाची व्यवस्था 
जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दर दिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात.
 प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये. प्रत्यक्ष वर्गाकरिता जेवणाची सुट्टी नसेल.

 ८ covid-19 संशयित आढळल्यास करावयाची कार्यवाही.
 शिक्षक कर्मचारी वर्ग किंवा विद्यार्थी संस्थेत आढळल्यास त्यास एका खोलीत इतरांपासून वेगळे ठेवावे वैद्यकीय अधिकाऱ्यांची संपर्क करून त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळतील याची दक्षता घ्यावी covid-19 ची लक्षणे आढळल्यास त्यास तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करावे शाळेजवळील कोबिर सेंटर आरोग्य केंद्रात बद्दलची माहिती मुख्याध्यापक व प्रत्येक शिक्षकांच्या मोबाइलमध्ये संबंधित वैद्यकीय अधिकारी संपर्क अधिकारी रुग्णवाहिकांची रुग्णवाहिकांची संपर्क क्रमांक व कृती आराखडा असावेत.

 ९ खेळाच्या मैदानात बाबत मार्गदर्शन 
सद्यस्थितीत पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ देण्यात येऊ नयेत. आजारी विद्यार्थी शोधणे.

 १० आजारी विद्यार्थी शोधणे.
ताप, सर्दी जोरात श्वासोश्वास करणारे, शरीरावर ओरखडे, डोळे लाल झालेले,पोट फुटलेली ,लाल झालेले हात, आणि सांधे सुजलेले ,उलट्या ,जुलाब व पोट दुखी असलेले विद्यार्थी वर्गात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना डॉक्टरांकडे नेण्याची व्यवस्था करावी डॉक्टरांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावा.

११ विद्यार्थ्या वरील मनोसामाजिक परिणामांबाबत विद्यार्थ्यांना शिक्षकांना अवगत करावे करणे, खालील लक्ष न दिसणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी विशेष काळजी घ्यावी जास्त चिडचिड करणारे, राग येत व छोट्याशा गोष्टीत मी निराश होणारे वर्गात नेहमी शांत बसणारी व कोणत्याही गोष्टीत स्वारस्य दाखवणारे वयाशी विसंगत वर्तन वर्तणूक दर्शवणारे उदाहरणार्थ अंगठा चोखणे इत्यादी खाण्याच्या व झोपण्याच्या सवयीत बदल दर्शवणारे शालेय शिक्षणात सर्वसामान्य गट दर्शवणारे व सहाय्य झाले व सतत रडणारी विद्यार्थी अशी लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी व त्यांच्याशी संवाद साधावा अशा विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करावे.

१२ विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये covid-19 सदृश्य लक्षणे निर्माण झाल्यास शाळेतील कोणाला covid-19 सदृश लक्षणे दिसू लागला लागल्यास घाबरून जाण्याची किंवा अशा व्यक्तीला भेदभावाची वागवण्यात येऊ नये. पालक आणि वैद्यकीय सुविधा केंद्रास कल्पना द्यावी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईपर्यंत किंवा पालक येईपर्यंत अशा विद्यार्थ्यांना मास्क सह शाळेतील वेगळ्या खोलीत ठेवावे.
 covid-19 विद्यार्थी वर्गामध्ये आढळल्यास पुढील प्रमाणे कृती योजना करण्यात यावी. तो विद्यार्थी वर्गामध्ये ज्या रांगेत बसतो. त्याच्या मागील व पुढील आणि दोन्ही बाजूच्या  विद्यार्थ्यांना निकट सहवासात मानावे. याशिवाय इतर कारणांमुळे बाधित विद्यार्थ्यांच्या निकट संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांची शिक्षकांची यादी करावी. अशा निकट सहवासात आलेल्या  विद्यार्थ्यांना दोन आठवड्याकरता होऊन कारण टाईम करावी या काळात ज्यांना कोबिर सारखी लक्षणे आढळतील त्यांनी कोबी चाचणी करून घ्यावी. ज्यांच्यामध्ये कोविल लक्षणे दिसून येत नाहीत अशा विद्यार्थ्यांनी 5/10 दिवसानंतर कोरोना चाचणी करून घ्यावी. ज्या वर्गात विद्यार्थी कोविड बाधित आढळून आले त्या वर्गातील बाकी 1% सोडियम हाय क्लोरो क्लोराईट द्रावणाने निर्जंतुकीकरण करण्यात यावे, तसेच स्वच्छतागृहे सामायिक जागा यांचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. शाळेतील काही विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना कोविड सारखी लक्षणे आढळल्यास किंवा कोणी कोरोना बाधित  आढळल्यास शाळेत आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी शाळा मुख्याध्यापक व प्रशासनाने घ्यावी.

१३ विद्यार्थ्यांच्या मनोसामाजिक स्वच्छता बाबत शिक्षकांना मार्गदर्शन करणे. 
 
१४ शिक्षक-पालक बैठकीत चर्चा करणे 

१५ घरात प्रवेश करताना घ्यावयाची काळजी घेणे.

१६ मानसिक व सामाजिक कल्याण उपरोक्त सूचना व्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्यक मार्गदर्शक तत्वे सूचना निश्चित करावीत व प्रभावी अंमलबजावणी अंमलबजावणी करावी.

 वरील  सूचना सविस्तरपने  खालील २०/०१/२०२२ च्या खालील शासननिर्णयात पाहू शकता.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.