शिष्यवृत्ती परीक्षेच्या आवेदनपत्रच्या मुदतीबाबत सूचना


पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या  मुदतीबाबत महत्त्वाची सूचना


          महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त एच. आय. आत्तार यांनी 21 जानेवारी 2022 रोजी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाच्या  अनुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती  परीक्षा ( पाचवी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी ) 2022 च्या परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरता शाळांना शाळा माहिती प्रपत्र व  ऑनलाईन आवेदन पत्र भरणे करता दिनांक 15 जानेवारी 2022 ते ३१ जानेवारी २०२२  या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली होती, परंतु काही प्रशासकीय कारणास्तव सदर मुदती मध्ये अंशतः बदल करण्यात  आला असून त्यानुसार दिनांक 31 जानेवारी ऐवजी दिनांक 25 जानेवारी २०२२  रोजी पर्यंत सुधारित मुदत देण्यात येत आहे. सदर परीक्षेकरता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील, त्यांनी दिनांक 25 जानेवारी 2022 अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी पर्यंत आवेदन पत्र ऑनलाइन भरलेल्या शाळांना 27 जानेवारी २०२२  रोजी पर्यंत शुल्काचा भरणा करता येईल. अशी सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तसेच भविष्यामध्ये आणखीन सहा दिवस मुदत वाढण्याची दाट शक्यता देखील परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर  वर्तवली गेलेली आहे.

खाली परिपत्रक देखील पाहू शकता व download करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.