साजुरच्या राजवीर पाटील ची नवोदय सह शिष्यवृत्ती परिक्षेमध्येही निवड
कराड दि ११ : (प्रतिनिधी)
साजुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या राजवीर संदीप
पाटीलची पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये सातारा जिल्हा ग्रामीण सर्वसाधारण
गुणवत्ता यादी मध्ये १०४ व्या क्रमांकावर निवड झाली. त्याला ३०० पैकी २४६
गुण मिळाले. राजवीर ची निवड नवोदय साठीही झाली आहे.गेले वर्षभर कोविड मुळे
शाळा बंद असूनही ऑनलाईन व स्वतः अभ्यास करून त्याने हे नेत्रदीपक यश
मिळवले.त्याला त्याच्या शिक्षकांनीही उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
राजवीरला त्याच्या वर्गशिक्षिका सुजाता कुंभार ,मुख्याध्यापिका
शर्मिला पाटील, तसेच इतर शिक्षक लतिका मोरे,निर्मला कराळे, माणिक शेवाळे
यांनी मार्गदर्शन केले.त्याने असे दुहेरी यश मिळवल्याने साजुर परिसरातून
त्याचे,त्याच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक होत आहे.
नवोदय सह शिष्यवृत्ती साठी निवड झाल्याने साजुर शाळेच्या शाळा
व्यवस्थापन समितेचे अध्यक्ष बलराज चव्हाण,साजुरच्या सरपंच करिष्मा
कुंभार,उपसरपंच संदीप पाटील,कराड पंचायत समितीचे माजी सदस्य विजय
चव्हाण,केंद्र प्रमुख सुवर्णा मुसळे,शिक्षण विस्तार अधिकारी जमीला मुलाणी,
गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी त्याचे अभिनंदन केले.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .