बदली अधिकार प्राप्त शिक्षक, संवर्ग ३ निकष, प्रक्रिया व कार्यपद्धती

 



बदली अधिकार प्राप्त शिक्षक (  संवर्ग ३ )निकष 


 जिल्हांतर्गत बदली नवीन धोरणामध्ये मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षकाची खालील प्रमाणे व्याख्या केली आहे .

बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक  म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक.


संवर्ग ३ ची बदली प्रक्रिया व कार्यपद्धती 

  4.4.1  टप्पा क्रमांक तीन प्रमाणे संवर्ग दोन च्या बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल, व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल, नंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील.
 4.4.2 यासाठी ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची तीन वर्षाची बदली करावयाची निश्चित धरावयाची अवघड क्षेत्रातील सेवा पूर्ण झालेली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र एक मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. 
 4.4.3 सदर कर्मचाऱ्यांच्या बदल्या या त्यांच्या बदल्यासाठी पात्र धरावयाच्या  सेवाज्येष्ठतेनुसार करण्यात येतील.
 4.4.4  सेवाजेष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली वधु अनुज्ञेय राहील.
 4.4.5  बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या या बदलीपात्र शिक्षकांचा जागेवर त्यांच्या विनंतीला प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.
 4.4.6  बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही.



 अवघड क्षेत्रा चे निकष (परिशिष्ट 1)

१. नक्षलग्रस्त पेसा गाव क्षेत्रात असणारे गाव 
२. वार्षिक सरासरी पर्जन्यमान दोन हजार मिलिमीटर पेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव (महसूल विभागाकडील माहितीनुसार )
३. हिंस्र  वन्य प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश(संबंधित उपवनसंरक्षक यांच्या अहवालानुसार) 
४. वाहतुकीचा सुविधांचा अभाव असणारे गाव तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव / रस्त्याने न जोडलेल्या शाळा( बस, रेल्वे, इत्यादी सार्वजनिक वाहतूक)
५. संवाद छायेचा प्रदेश (संबंधित महाप्रबंधक बीएसएनएल यांच्या अहवालानुसार) 
६. डोंगरी भाग प्रदेश (नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार) 
७. राष्ट्रीय राज्य महामार्गापासून 10 किमी पेक्षा जास्त दूर

 दि. ७ एप्रिल २०२१ च्या जिल्हांतर्गत बदलीच्या शासन निर्णयामध्ये अवघड क्षेत्राच्या व्याख्या १.१ मध्ये असं स्पष्ठ सांगितलं आहे कि वरील 'परिशिष्ठ १ मध्ये नमूद असणाऱ्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल'.

                वरील प्रमाणे जिल्हा स्तरावर अवघड क्षेत्र ठरवण्यासाठी खालील प्रमाणे समिती घटित करण्यात येत आहे.सदर समितीने अवघड क्षेत्राचे दर तीन वर्षांनी (मार्च महिन्यात) पुनर्विलोकन करण्यात यावे. 

समिती 
१. मुख्य कार्यकारी अधिकारी - अध्यक्ष
२. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) - सदस्य 
३. कार्यकारी अभियंता जि प बांधकाम विभाग - सदस्य 
४.कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग - सदस्य
५. विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ - सदस्य 
६. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) - सदस्य सचिव

टिप्पणी पोस्ट करा

31 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. 2.3.1 रिक्त पदे दाखवताना संवर्ग 3 ने बदली हवी म्हंटले तर त्याची शाळा संवर्ग 1 व2 साठी रिक्त दिसणार का?

    उत्तर द्याहटवा
  2. 1.10
    4.4.6
    नुसार संदिग्धता वाढली आहे
    1.10नुसार अवघड क्षेत्रातील शिक्षक बदलीपात्र होणार नाही
    4.4.6नुसार बदलीपात्र नसेल तर बदली होणार नाही
    विसंगत अर्थ निघतात

    उत्तर द्याहटवा
  3. ज्या शिक्षकांची अगोदर अवघड क्षेत्रातसे झाली आहे.परंतू सध्या त्यांची सोपे क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.अशा शिक्षकांना २०१७ च्या जी.आर नुसार त्यांना संवर्ग तीन शिक्षक व सोप्या क्षेत्रातील सिनियर शिक्षकांचा खो बसत नव्हता.परंतू या नवीन जी आर नुसार नेमके काय होईल.हे काही ही स्पष्ट केलेले दिसून येत नाही.

    उत्तर द्याहटवा
  4. आपण सवंर्ग ३ मधून अर्ज भरला ,
    आणी ज्या तालूक्यात बदलीने जायचे आहे . त्या तालूक्यात जागा उपलब्ध नसतील तर , नकार देण्याचा अधिकार आहे का ?

    उत्तर द्याहटवा
  5. महिला अवघड क्षेत्रातील महिला शिक्षकांना एक वर्ष सेवा असल्यास बदली पात्र होतील का

    उत्तर द्याहटवा
  6. अवघड क्षेत्रातील बदली पात्र शिक्षक नकार देऊ शकतो का ?

    उत्तर द्याहटवा
  7. सरजी संवर्ग चार मध्ये अगोदर कोणाला खो बसेल सिनियर कि ज्युनिअर

    उत्तर द्याहटवा
  8. अवघड क्षेत्रातून अवघड क्षेत्रात बदली मागता येतेका

    उत्तर द्याहटवा
  9. अवघड क्षेत्रात 3 वर्ष झाली आहेत आणि तीच आता शाळा सुगम झाली आहे. बदली पात्र आहे का सर




    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अवघड क्षेत्रात3 वर्षे झाली आणि तीच शाळा सुगम मध्ये आली तर बदलीसाठी अर्ज करता येईल का?

      हटवा
  10. अवघड क्षेत्रात 3 वर्ष झाली आहेत आणि तीच शाळा आता सुगम झाली आहे. बदली पात्र आहे का सर मी यावेळी. कारण मला बदली हवी होती

    उत्तर द्याहटवा
  11. अवघड क्षेत्रात 3 वर्षे झाली आणि तीच शाळा सुगम मध्ये आली तर बदलीसाठी अर्ज करता येईल का?

    उत्तर द्याहटवा
  12. काय वारंवार तीच माहिती शेअर करता बदल्या तर होत नाहीत मार्च एप्रिल मध्ये केवळ बदलीचे वारे वाहतात. प्रत्यक्ष कार्यवाही शून्य

    उत्तर द्याहटवा
  13. सर,जर पती अवघड क्षेत्रात असेल व पत्नी सोप्या क्षेत्रात असेल परंतू ते ३० कि.मी च्या आत आहेत व पतीची सेवा अवघड क्षेत्रात ४ वर्ष झाली आहे,परंतू पती बदली करू इच्छितो तर,एक युनिट म्हणून दोघांची बदली होऊ शकते का?

    उत्तर द्याहटवा
  14. 2022 ची आवघड क्षेत्र यादी घोषित केली मात्र पोर्टलवर 2017 ची जूनी यादी दाखवत आहे...नविन यादी का दिसत नाही मो.8275412733

    उत्तर द्याहटवा
  15. हरेश इंगळे अकोला१३ जून, २०२२ रोजी १०:२८ PM

    शिक्षक बदली पोर्टल ला या वर्षी अवघड क्षेत्र घोषित यादी उपलब्ध / अपलोड का झाली नाही या विषयी माहिती पाठवा सर. 9764533657

    उत्तर द्याहटवा
  16. अवघड क्षेत्र 2022 यादी protal वर कधी दिसणार आहे?

    उत्तर द्याहटवा
  17. पूर्वी शाळा सोप्या क्षेत्रात होती आता 2022 नुसार शाळा अवघड क्षेत्रात आलेली आहे तर आम्हाला अवघड क्षेत्राचा लाभ मिळेल का?

    उत्तर द्याहटवा
  18. सर, Entitled list लिस्ट मधिलcurrent area date पासून बदली सेवाजेष्टता ग्राहय असते कि current school joining date पासून please reply

    उत्तर द्याहटवा
  19. माझी शाळेला रुजू तारीख 1जुलै 2019 आहे. माझे नाव बदली अधिकार मध्ये येईल काय.

    उत्तर द्याहटवा
  20. सर एकदा भरलेलं फॉर्म withdrawl करून पुन्हा भारता येतो का

    उत्तर द्याहटवा
  21. अंतर जर 28किमी असेल तर कोणत्या संवर्गात अर्ज करावा

    उत्तर द्याहटवा
  22. मला सुलभ क्षेत्रात 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु मला अवघड क्षेत्रात बदली करता येईल का?

    उत्तर द्याहटवा
  23. 2022च्या यादीतील दुर्गम घोषित करण्यात आलेल्या शाळेतील शिक्षकांना संवर्ग 3चा लाभ केव्हा मिळेल

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .