जिल्हांतर्गत बदली बाबत आज दि १९ जानेवारी २०२२ च्या सचिवांच्या सूचना
महाराष्ट्राचे शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार साहेब यांनी आज एक जिल्हांतर्गत बदली संदर्भात पत्र काढले असून या पत्रामध्ये त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना सूचना केल्या आहे की जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयान्वये नवीन धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. सन 2022 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत सॉफ्टवेअर कंपनीची देखील नियुक्ती करण्यात आलेली असून सदर कंपनीने बदल्यांबाबतची कार्यवाही देखील सुरू केलेली आहे.सन 2022 मध्ये करावयाच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्या करिता संदर्भधीन शासन निर्णय मध्ये दिलेल्या सूचनेनुसार सर्व प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भात खालील माहितीची पूर्तता करणे आवश्यक आहे .
१. बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांची यादी.
२. विशेष संवर्ग भाग १ मधील शिक्षकांची यादी.
३. विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांची यादी.
४. निव्वळ रिक्त पदांची यादी (Clear Vacancy)
५. संभाव्य रिक्त पदांची यादी.
६. जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे.
वरील प्रमाणे कार्यवाही अद्याप झाली नसल्यास त्या बाबतची प्रक्रिया 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात यावी.असे पत्रात स्पष्ट नमूद केले आहे .
थोडक्यात 2022 ची बदली प्रक्रियेची सुरवात प्रशासनाकडून सुरू झालेली आहे. जिल्हा परिषदेला स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की जिल्हांतर्गत बदल्यांच्या बाबत ची पूर्वतयारी 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. या शासनाच्या या वर्षीच्या पहिल्या पत्रावरून आपणास लक्षात येते की या वर्षी शासनाने जिल्हांतर्गत बदल्यांसंदर्भात ची बाबत कार्यवाही सुरू केली आहे.
खालील परिपत्रक पाहू शकता.
संवर्ग 3 बाबत काय?
उत्तर द्याहटवाज्या शाळा अवघड होत्या व आता सोपे क्षेत्र घोषित झाल्या त्या शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना संवर्ग 3 चा लाभ मिळेल का? का ते पुढील 10 वर्ष बदलीपात्र होणार नाहीत.
होय ज्यांनी अवघड क्षेत्रात तीन वर्षा पेक्षा जास्त सेवा केली .त्यांचावर अन्याय होत आहे.त्यांची शाळा आता सोपे क्षेत्रात आली आहे.कृपया त्यांना बदली पात्र मध्ये नोद करावी.
हटवाrandom visthapit
उत्तर द्याहटवाvalyana chance asel ka
एकाच शाळेवर किती वर्ष सेवा झाल्यास बदली पात्र ग्रहीत धरण्यात येणार
उत्तर द्याहटवामी सवर्ग १ चा लाभ २०२० ला घेतला आहे. माझी विद्यमान शाळा सुगम क्षेत्रात असून मला आता दुर्गम क्षेत्रात बदली हवी असल्यास बदलीसाठी अर्ज करता येईल का ?
उत्तर द्याहटवाज्या शाळा अवघड क्षेत्रात होत्या, त्या आता सुगम क्षेत्रात आल्या आहेत. त्यामुळे माझी सलग सेवा 10 वर्षांच्या वर येऊन मी बदलीपात्र होईन का. मग आधीच्या दुर्गम क्षेत्रातील सेवेचा मला काहीच फायदा होणार नाही.
उत्तर द्याहटवामी २०१८ मध्ये झालेल्या जील्हंतर्गत बदल्यातील random round मध्ये बदली झालेला आहे.मला या वर्षी बदलिमध्ये संधी राहील का?
उत्तर द्याहटवामाझी random round मध्ये सर्वसाधारण क्षेत्रातील शाळेवर बदली झालेलीअसून सध्याच्या शाळेवर मी 18 जून 2018 रोजी रुजू झालेला आहे. तरी मला यावर्षी बदली मध्ये संधी राहील का?
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .