जिल्हांतर्गत बदली शासननिर्णय GR दि ७ एप्रिल २०२१




 जिल्हा अंतर्गत बदलीबाबत नवीन GR दि ७ एप्रिल २०२१ 

                      शासनाने यापूर्वी दिनांक 15 मे 2014 च्या शासन निर्णयान्वये  जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्याबाबत धोरण निश्चित केलेले होते. सदर धोरणानुसार जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्याही जिल्हांतर्गत बदल्या करण्यात येत होत्या, परंतु शिक्षक संवर्गाची मोठी संख्या ,त्यांची इतर सर्वर्गा पेक्षा असलेले कामाचे स्वरूप लक्षात घेता शिक्षकांच्या बदली बाबत स्वतंत्रपणे विचार करून 15 मे 2014 च्या शासन निर्णयातून शिक्षक वर्ग वगळला. शिक्षकांच्या बदल्या २७ फेब्रुवारी २०१७  च्या शासन निर्णया द्वारे ऑनलाईन करण्यात आल्या.परंतु आता विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळे मधील विद्यार्थी संख्या ,शिक्षकांच्या काम करत असताना शिक्षकांना येणारी अडीअडचणी, हे विचारात घेऊन नव्याने शिक्षक बदली धोरण निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.त्या नुसार नवीन जिल्हा अंतर्गत धोरण निश्चित करण्यात आले .      

                  शिक्षक वर्गाच्या नवीन बदली धोरणानुसार  शासनाने दि ७ एप्रील २०२१  रोजी शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी  नवीन  शासननिर्णय काढलेला आहे . शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठीचे पूर्वीचा  २७ फेब्रुवारी २०१७  चा जिल्हा अंतर्गत आलेला शासननिर्णय अधिक्रमित म्हणजेच  रद्द केला असून त्या अनुषंघाने आलेली नंतरची सर्व शुद्धिपत्रके रद्द केली आहेत. येथून पुढे शिक्षक वर्गाच्या जिल्हा अंतर्गत बदल्या  या ७ एप्रिल २०२१  च्या नवीन शासन निर्णयानेच होतील...!!!!

क्रमश.....(पुढील भागात टप्या टप्याने सोप्या शब्दात समजावून  घेवू )

दि ७ एप्रिल २०२१ चा शासननिर्णय खाली पाहू शकता तसेच download देखील करू शकता..


टिप्पणी पोस्ट करा

9 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. संवर्ग 2चा लाभ घेतल्यास दोघांना एकाच शाळेवर नियुक्ती दिली गेली पाहिजे.
    नवीन बदली आदेशाकडून खूप अपेक्षा आहेत.
    Best luck

    उत्तर द्याहटवा
  2. संवर्ग 1मध्ये बदलीसाठी शाळेवर किती वर्ष पूर्ण असावी लागतात?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. पूर्वी लाभ घेतला असेल तर 31 मे 2022ला 3 वर्षे सध्याच्या शाळेवर पूर्णझाली असावीत

      हटवा
  3. पदवीधर विषय शिक्षकांसाठी के धोरण आहे..
    त्यांच्या जागा कश्या निश्चित करण्यात येतील??

    उत्तर द्याहटवा
  4. संवर्ग 1 व 2 साठी बदलित 3 किंवा 5 वर्षाची अट आहे काय?

    उत्तर द्याहटवा
  5. संवर्ग 3 ( बदली आधिकार पात्रं) शिक्षकाना 30 शाळापैकी एकही शाळा मिळाली नसल्यास तो शिक्षक विस्थपित होईल का

    उत्तर द्याहटवा
  6. संवर्ग 4 मधील शिक्षकांचा विचार कधीच केला जात नाही.

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .