विशेष संवर्ग शिक्षक भाग १ निकष व बदली प्रक्रिया कार्यपद्धती




विशेष संवर्ग शिक्षक भाग १ निकष 

शासनाचे निश्चित केलेल्या नवीन जिल्हा अंतर्गत धोरणानुसार  संवर्ग १ मध्ये खालील शिक्षक विशेष संवर्ग भाग  १ म्हणून ओळखले जातील .

 1.8.1  पक्षाघाताने आजारी शिक्षक (paralysis)
 1.8.2  दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14 -1 -2011                    मधील नमूद प्रारूप प्रमाणे सक्षम प्राधिकारी याचे प्रमाणपत्र आवश्यक)
            मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास                    बहिण भाऊ) तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक 
1.8.3   हृदय शस्त्रक्रिया झालेली शिक्षक 
1.8.4  जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक/ डायलिसिस सुरू असलेले            शिक्षक 
1.8.5  यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक 
1.8.6  कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक
1.8.7  मेंदुचा आजार झालेले शिक्षक 
1.8.8  थॅलेसेमिया विकार ग्रस्त  मुलांचे पालक / जन्मजात गुणसूत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदाहरणार्थ             methyl malonic acidemia (MMA) classical type )(mutase defiency व इतर आजार) (पालक            म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ) 
1.8.9  माजी सैनिक तसेच आजी / माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा 
1.8.10 विधवा शिक्षक 
1.8.11  कुमारिका शिक्षक 
1.8.12 परितक्त्या / घटस्फोटित महिला शिक्षक 
1.8.13  वयाची 53 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक
1.8.14 स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्रसैनिक हयात असेपर्यंत)

 खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक
 
1.8.15  हृदय शस्त्रक्रिया झालेली 
1.8.16 जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसिस सुरू                      असलेले  
1.8.17  यकृत प्रत्यारोपण झालेले 
1.8.18 कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले 
1.8.19  मेंदूचा आजार झालेले
1.8.20  थॅलेसेमिया विकार ग्रस्त असलेली



४.२ संवर्ग १ बदली प्रक्रिया कार्यपद्धती 

 4.2.1  टप्पा क्रमांक एक प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल व विशेष संवर्ग एक शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल तद्नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग-1 यांच्या बदल्या करण्यात येतील. 
4.2.2 विशेष संवर्ग १ मध्ये  शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंती वरूनच बदली देण्यात येईल. या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल तर मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत आले असल्यास त्यांनी  विवरण पत्र क्रमांक 3 मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.
 4.2.3 विशेष संवर्ग १ अंतर्गत बदली साठीचा विनंती बदलीसाठी चा प्राधान्यक्रम हा विषय संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारी नुसार  राहील.
 4.2.4  एखाद्या विशिष्ट संवर्गा मध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती  बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवाजेष्ठता विचारात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्रथम बदली अनुज्ञेय राहील. 
4.2.5 सेवाजेष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील.
 4.2.6 या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यांसाठी प्राधान्यक्रम नुसार यादी तयार करण्यात येईल. या यादीच्या आधारे बदली करताना शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीपात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल.जर एखादा विशेष  संवर्ग शिक्षकांना त्याच्या पसंतीप्रमाणे एकाही शाळेमध्ये तेथे बदलीपात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने बदली देता आली नाही तर त्याची बदली होणार नाही. 
4.2.7  विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत एकदा बदलीचा भाग घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.  
4.2.8 विषय संवर्ग भाग 1 मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकारी याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील सदरच्या अर्जाच्या पात्र ते बाबत संबंधित गटाचे गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेईल.


(संदर्भ : जिल्हा अंतर्गत बदली नवीन GR दि ७ एप्रिल २०२१ )

टिप्पणी पोस्ट करा

39 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. सवर्ग 1 मधून बदलीसाठी सध्याच्या शाळेवर किती वर्षे कालावधी पूर्ण असावा लागतो ?की यासाठी कालावधीची अट नाही .कपया मार्गदर्शन मिळावे ही विनती

    उत्तर द्याहटवा
  2. मुलगा मानसिक विकलांग तसेच 53 वर्ष पूर्ण याकरिता दोन्ही निकष एकाच वेळेला दाखवावे का?

    उत्तर द्याहटवा
  3. नमस्कार मान्यवर.मी औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव पायी जाताना विना इन्श्योरन्सवाल्या गाडीने 8/11/2015ला पतीला उडवले म्हणून दोन्ही पायांनी कायमचे अपंग अवलंबून व बेरोजगार मा.घाटी अॉनलाईन प्रमाणपत्र व सामाजिक न्याय मंत्रालयाचे युनिक डिसेबिलिटी कार्ड नुसार पत्नी नाते पालक म्हणून माझे नाव आहे.अशी अपंग पतीची पालक होते आता 11/11/2020पासून अपंग बेरोजगार पती ची पेन्शन न घेणारी विधवा कर्मचारी शिक्षिका सिंगल पॅरेंट सिंगल एम्प्लाय, दोन लेकरांची आई, घर शाळा दोन कुटुंब सांभाळणारी प्रभारी मुख्याध्यापिका आहे.पती अपंग पण कर्मचारी नव्हते मी कर्मचारी पण अपंग नाही म्हणून दोघेही वंचित सवलतींपासून.आता वर विधवा तिथे विधुर ही असावे. माझेमाजी सैनिक वडील ही 23/1/2021ला देवाघरी गेले.स्वातंत्र्य पंचाहत्तरीनंतरतरी माजी सैनिक नातू पणतू नोकरी त लागताहेत शिक्षक बदली जीआर मध्ये यावे.कला क्रीडा शिक्षक सहाते आठ मध्ये मोजत असतील तर तेही तीन वर्षांत बदली यादीत असावे, दरवेळी ते विशेष म्हणून तिथेच राहतात व एक पदवीधर बदलीने उडतो हा माझा अनुभव.जिल्हा बदली वाल्यांचीही तीन वर्षे एका शाळेत सेवा बदली पात्र असावी.सातारा तांडा सारखी सिटी अलाउन्ससह शाळा तर दहा बारा वर्षे जोडीदार ही जवळ असे स्थानिकचे जिल्हा बदलीवाले आनंदात राहतील,माझीच आधीची तीन जिल्हा बॉण्ड्री ची शाळा तिथेही जिल्हा बदलीने आलेल्या अडीच वर्षे लहान लेकरं असणारी एकल महिला, खाजगी संस्थेतून जिपत आलेले एकल शिक्षक बांधव आहेत,ते दहा वर्षे कसे जगतील हेही लक्षात घ्यावे.एक पगार एक घरभाडे एक टॅक्स घेणारेही सारखेच मन लावून काम करतात, निदान कुटुंब जगवावे.एका पगारावर आई वडील जोडीदार स्वतः व दोन अपत्य असे सहा जण जगवावे लागतात.जवान किसान जय नारा, बॉण्ड्री विना कुठे थारा.. अपंग कर्मचारी, संवर्ग एक या स जवळची शाळा मिळते,तेचूप.जोडीदार तीस किमी आत,ते चूप.एकलजागी घरचे ताई दादा समजून ती शाळा सोपी अवघड समजून घ्यावे. पतीची पेन्शन न घेणार्या विधवा कर्मचारी 5%असतील, अपंग बेरोजगार पती ची विधवा मी एकटी आहे.विधवांना पदोन्नती स्वतंत्र यादी ने देऊन दहावी ते पदव्युत्तर पर्यंत चे सगळे ए ग्रेड डीएड बीएड एम एड पीएचडी शासकीय असणारे अशांना जवळ पद स्थापना मिळावी.दोन अपत्य जन्म घाटीतील, सरकारी दवाखान्यात,तेथेच सरकारी दवाखान्यात कर्मचारी किंवा जोडीदार ची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेले, नंतर अबॉर्शन रजा न घेतलेले अल्पसंख्य शिक्षकांना त्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आदर्श स्वतःपासून सुरुवात त्या वर्षाची आयुष्यात नोकरीत एकदा एक जादा वेतनवाढ द्यावी. एका तालुक्यात ,सिटी अलाउन्ससह शहरात दहा-वीस वर्ष सेवा झालेले बदलीशिक्षक इ.बदली निकष असतील ते देताना जोडीदार एकच शाळा दिली, दोन घरभाडे दोन कर्मचारी म्हणून देता तसे मतदान जनगणना ड्युटी सोबत दिली तरी बर्याच बांधवांच्या अडचणी सुटतील.सर्वांचेच जोडीदार एका भागात नाहीत, कुठेही राहो, फक्त कामावर वेळेवर पूर्णवेळ येऊन ते इमानदारीने वेळेवर करणेही महत्त्वाचे आहे.विधवांना तरी शाळा तिथे रहा अट नसावी.बदलीआधी त्या तालुक्यातील पगार पत्रक एकेक झेरॉक्स व जीपीएफ हिशेब जुळवून शिक्षकांना मिळावे.कपात ओके असते,स्लीप हिशेब जुळावे. शिक्षक हजेरी झेरॉक्स सह सर्विस बुक ला रजा नोंद सह पूर्ण असावी.मयत अपंग जोडीदार पालक अपत्य नोंद असावी.फेब्रुवारी विमा नोंद दरवर्षी न घेता निवृत्त किंवा मयत यांचीच व्हावचर क्रमांक सह एक नोंद घ्यावी.दोन अपत्य वारसदार नोंद करून घ्यावी.सगळे टपाल असते, सर्विस बुक,जीपीएफशिक्षणसेवकपासून ओके असावे. एकवीस वर्षात चार तालुके सात शाळा झाल्या.. पगार स्लीप शिक्षकांना मिळत नाहीत, पूर्ण आर्थिक हिशेब ला नंतरच्या लेकरं, वृद्ध आई-वडील, अनभिज्ञ जोडीदार, चे खूप हाल होतात, समजून ही समस्या निकाली काढावी.

    उत्तर द्याहटवा
  4. परितक्ता साठी कोणते पुरावे लागतात आणि त्याची व्याख्या काय आहे हे सांगाल का sir

    उत्तर द्याहटवा
  5. मेंदूच्या आजारांमध्ये epilepsy येते का?

    उत्तर द्याहटवा
  6. संवर्ग 1 मधे मणक्याचे आजार याचा समावेश होतो का? Please मार्गदर्शन व्हावे

    उत्तर द्याहटवा
  7. संवर्ग भाग१ मध्ये 3O% दिव्यांग प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाते का ?

    उत्तर द्याहटवा
  8. परित्यक्ता ची व्याख्या काय आहे व त्या संदर्भात कोणते पुरावे आवश्यक आहे

    उत्तर द्याहटवा
  9. संवर्ग -१ विधवा /अपंग / परितक ता यांना एकाच शाळेवर किती वर्षे यालाही मर्यादा ठेऊन त्यांच्या सोईने ठिकाण बदल होणे आवश्य क आहे .

    उत्तर द्याहटवा
  10. पती 53 वर्षे पूर्ण, व पत्नी दुसऱ्या शाळेवर बदली होऊन 3 वर्षे झाली तर बदली एकत्रितपणे होईल का?तशी विनंती करता येईल का?असल्यास सेवाज्येष्ठता कोणती विचारात घेतली जाईल.

    उत्तर द्याहटवा
  11. पूर्वी संवर्ग 1 चा लाभ घेतला नाही आता घेता येतो का


    उत्तर द्याहटवा
  12. सन 2020 ला सवर्ग १ चा लाभ घेतला असेलतर आता पुन्हा लाभ घेता येईल का ?
    सुधारीत GR २०२१ ला आला आहे.

    उत्तर द्याहटवा
  13. स्तनदा माता साठी प्रवर्ग 1 चा लाभ मिळतो का?

    उत्तर द्याहटवा
  14. आंतरजिल्हा बदली संवर्ग 1 मधून नोव्हेंबर2020 मध्ये बदली झाली आहे.
    तरी या वर्षी जिल्हा अंतर्गत बदली घेता येईल का याचे मार्गदर्शन करावे

    उत्तर द्याहटवा
  15. 53 + साठी गटशिक्षणाधिकारी यांचे वया बाबतचे प्रमाण पत्र जोडणे अवशयक आहे का?

    उत्तर द्याहटवा
  16. निवडश्रेणी रजिस्ट्रेशन

    उत्तर द्याहटवा
  17. निवडश्रेणी रजिस्ट्रेशन

    उत्तर द्याहटवा
  18. संवर्ग1 मधील शिक्षकांना रिक्त पदाच्या शाळा मागता येतात का?

    उत्तर द्याहटवा
  19. आई किंवा वडील मानसिक रुग्ण असल्यास त्यांचे प्रमाणपत्र संवर्ग 1 साठी उपयोगी पडेल का मार्गदर्शन करा

    उत्तर द्याहटवा
  20. जुलै 22 मध्ये विज्ञान शिक्षक प्रमोशन मिळाले असेल तर संवर्ग १ बदली पात्र असेल का ? पोर्टलवर जुन्या शाळेची तारीख दिसत आहे ? ऑनलाईन बदली अजून एकदाही झाली नाही . ( पोर्टलने )

    उत्तर द्याहटवा
  21. 19 September च्या पत्रानुसार आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्हास्तरावरील बदली झाल्यावर पद स्थापना देता येणार असे असताना काही जिल्हा परिषद मध्ये पद स्थापना देण्यात आली आहे असे वाटते तेव्हा काय करायचे आहे 🙏

    उत्तर द्याहटवा
  22. आम्ही दोघेही जि प पुणे येथे शिक्षक आहोत.दोघेही बदली पात्र आहोत.माझे वय 54 आहे .मला संवर्ग 1मधून बदली हवी असल्यास दोघांचे एक युनिट होईल का.तसेच मी नकार दिला तर पत्नीला बदली अर्ज करताना मला ज्याईन होता य‌ईल का.

    उत्तर द्याहटवा
  23. संवर्ग १ मध्ये बदलीसाठी प्राधान्यक्रम देताना फक्त ४ ते ५ शाळांची नावे टाकली तर चालेल काय ?

    उत्तर द्याहटवा
  24. जोडीदाराची हृदयशस्त्रक्रिया झालेले संवर्ग 1 मध्ये लाभ घेता येतो असा GR आहे ,यांचा अर्थ जोडीदार नोकरी मध्ये नसेल किंवा सेवानिवृत्त झालेला असेल तर संवर्ग 1 चा लाभ घेता येईल का?

    उत्तर द्याहटवा
  25. संवर्ग 1 मधून 1 किंवा 2 शाळा लीपसंती क्रम देता येतो काय एकदा बदली प्रक्रिया मध्ये भाग घेतल्यावर बदली झाली नाही तर पुन्हा पुढच्या वर्षी भाग घेता येतो काय

    उत्तर द्याहटवा
  26. संवर्ग 1 Autoimmune disease चा समावेश आहे का..

    उत्तर द्याहटवा
  27. यावर्षी संवर्ग1 मध्ये असून, बदली नको,हा पर्याय दिला तर पुढील वर्षी बदली प्रक्रियेत भाग घेता येईल का?

    उत्तर द्याहटवा
  28. गरोदर माता साठी संवर्ग 1मध्ये काही सूट आहे का plz ans

    उत्तर द्याहटवा
  29. संवर्ग एक मधून मला बदली हवी आहे असे म्हंटले आहे.पण आता मला बदली नको आहे..तर त्यासाठी काय करता येईल

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .