नवीन जिल्हा अंतर्गत बदली धोरणा मधील महत्वपूर्ण व्याख्या

 


नवीन जिल्हा अंतर्गत बदली धोरण शासन निर्णय दि ७ एप्रिल २०२१  मधील महत्वपूर्ण व्याख्या  

    नवीन जिल्हा अंतर्गत बदली धोरणामध्ये काही महत्वपूर्ण व्याख्या केलेल्या आहेत.खालील  व्याख्या आपण समजावून घेवूयात .....

  १ .१ अवघड क्षेत्र

 अवघड क्षेत्र निकष परिशिष्ट  मध्ये नमूद असणाऱ्या सात बाबींपैकी किमान तीन बाबींची /निकषांची पूर्तता होईल असे गाव /शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल. 

१.२ सर्वसाधारण क्षेत्र 

 वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावी ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.

१.३ बदली वर्ष 

  ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत बदल्या करायचे आहेत ते वर्ष. 

१.४ बदली साठी निश्चित करावयाची सेवा 

 अवघड क्षेत्रनिहाय व सर्वसाधारण सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा. 

१.५ शिक्षक 

  या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक

१.६ सक्षम अधिकारी 

  शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील.

क्रमश .....(पुढील भागात सविस्तर पाहू )

टिप्पणी पोस्ट करा

14 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. मी संवर्ग १ मध्ये स्वतः अपंग आहे आणि माझी आंतरजिल्हा बदली ११ सप्टेंबर २०१९ रोजी झाली त्यावेळी मला सोयीची शाळा मिळाली नाही दुसऱ्या तालुक्यात सपुपदेशाने शाळा दिली तर आता मी अर्ज करु शकतो का

    उत्तर द्याहटवा
  2. माझी आंतरजिल्हा बदली २० मधे झाली आहे,मी संवर्ग १ मधे आहे,मला आता सोयीची शाळा मिळाली नाही तरी आता मी form भरू शकते ना...

    उत्तर द्याहटवा
  3. सलग सेवा ही आंतर जिल्हा बदलून आल्यावर कोणती धरली जाईल

    उत्तर द्याहटवा
  4. संवर्ग १ सोडून इतर संवर्गाच्या बदल्या करताना रिक्त जागी बदली केली जाईल असे नमूद आहे .रिक्त जागा म्हणजे कोणत्या? सर्व बदलीपात्र शिक्षकांच्या जागा म्हणजे रिक्त जागा की मुळातच रिक्त असलेल्या रिक्त जागा?

    उत्तर द्याहटवा
  5. *मेंदूच्या आजारात कोणकोणत्या आजारांचा अंतर्भाव होतो कृपया मार्गदर्शन करावे*

    उत्तर द्याहटवा
  6. संवर्ग:१मध्ये मणक्याचा विकार आहे काय

    उत्तर द्याहटवा
  7. हॅलो नमस्कार सर मी संवर्ग १ दिव्यांग आहे माझी पत्नी
    व मीZP शिक्षिकआहे जोडीदार म्हणून बदली मागू शकते का .दोघांच्या शाळेतील अंतर 25 किलोमीटर आहे

    उत्तर द्याहटवा
  8. हृदय शस्त्रक्रियेत कोणत्या शस्र क्रिया येतात

    उत्तर द्याहटवा
  9. मी तीन वर्षांपूर्वी विस्थापित होते.या वर्षी प्रति संवर्ग १.८.१३ बदली पात्र आहेत पती पत्नी एकत्रीकरण एका युनिट मध्ये बदली करता येईल का?

    उत्तर द्याहटवा
  10. विनंती बदली संदर्भात मार्गदर्शन करा plz

    उत्तर द्याहटवा
  11. अवघड क्षेत्र मधील सेवा वेगळी व सोप्या मधील वेगळी मोजणार का... माझी अवघड मध्ये 13
    माझी अवघड मध्ये 13वर्ष व सोप्यात 11 वर्ष आहे .. आता बदलिपत्र

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .