स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२०२२

 


स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२०२२ 


 

 विषय 

 

लिंक 

 

 

 

 

 स्वच्छ विद्यालय पुरस्कार मराठी  माहिती पुस्तिका 

 download

 

 

 स्वच्छ विद्यालय पुरस्कार GR

 download

 

 

 स्वच्छ विद्यालय पुरस्कार app 

 link

 

 

 स्वच्छ विद्यालय पुरस्कार वेबसाईट 

 link

 अधिक माहिती 

 view

         

स्वच्छ विद्यालय नोंदणी व माहिती मोबाईल app वर कशी भरावी ते थोडक्यात पहा.

नोंदणी 

      नोंदणी साठी प्रथम Apps Download करून open करणे.sign up करणे.पहिल्यांदा आपल्या शाळेचा  युडायस नंबर टाकावा. नंतर आपल्या शाळेची माहिती open होईल .खालील इतर सर्व  माहिती भरावी. passward तसेच इतर सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट करणे . आपली नोंदणी पूर्ण होईल.

माहिती कशी भरावी ?

        नोंदणी केल्यानंतर आपल्या शाळेचा  udise व नोंदणीच्या वेळी टाकलेला passward टाकून sign इन करणे .पहिल्यांदा primary info मधील माहिती भरून सबमिट करणे .पुढील survey  tab मधील सहा क्षेत्रामधील प्रश्नावली सोडविणे. योग्य पर्याय निवडणे.खाली शाळेचे निकषानुसार फोटो अपलोड करून शेवटी final submit करणे .(आपण सर्व प्रश्नावली पूर्ण केल्यानंतरही final submit करू शकता व नंतर फोटो अपलोड करू शकता .फोटो साईज शक्यतो १०० ते 400 KB असावी)

फोटो कोणते अपलोड करावे ?

 1 शाळा आणि समोरचे शाळा आणि परिसराचे समोरचे दृश्य

 2 शाळेचे प्रांगण शाळेच्या परिसराची संपूर्ण स्वच्छता दर्शवते

 3  मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे दोन फोटो 

4  CWSN साठी फंक्शनल टॉयलेट 

5  शाळेतील बागेवर पोषक आहार 

6  सॅनिटरी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था दर्शविणारा  

७ साबणाने हात धुण्याची सोय आणि शौचालयाचा वापर आणि मध्यान्न भोजन दुपारच्या जेवणाच्या वेळी 

8 पाण्याची गुणवत्ता चाचणी अहवाल 

9 शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र / दस्तऐवज

परिपत्रक नियोजन व वेळापत्रक 

          मा. संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी दिलेल्या परिपत्रकातील   सुचनेनुसार  भारत सरकारने दिनांक 2 ऑक्टोंबर 2014 पासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केलेली आहे. देशातील सर्व शाळांसाठी 2015-16 पासून स्वच्छ विद्यालय पुरस्कार सुरू केले आहे. स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 साठी मार्गदर्शक सूचना तसेच शाळांसाठी नामनिर्देशन करताना आवश्यक असलेली प्रश्नावली केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर पुरस्काराकरिता नामांकन करणाऱ्या शाळांनी सादर केलेल्या माहितीची पडताळणी जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर करण्यात येणार आहे. स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शासकीय अनुदानित व खाजगी शाळा पात्र असून त्यांना या पुरस्कारासाठी नामांकन सादर करता येईल. पुरस्कारासाठी राष्ट्रीय पातळीवर 46 राज्य पातळीवर 26 व जिल्हा पातळीवर 38 शाळांची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेकरिता निश्चित करण्यात आलेल्या सहा घटकांसाठी 59 निर्देशांक निश्चित करण्यात आलेले आहेत व त्यानुसार शाळांना प्राप्त होणारे गुण विचारात घेऊन श्रेणी देण्यात येणार आहे. सदर पुरस्कारासाठी शाळांनी नामांकन सादर करण्याची मुदत अंतिम मुदत दिनांक ३१/०३/२०२२  असून शाळांनी http://education.gov.in  ---- Swacch vidyalay---- Swacch vidyalay puraskar 2021-22 --- या संकेतस्थळावर किंवा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 या एप्लीकेशन वर शाळेचा यु डायस कोड वापरून नोंदणी करायची आहे.


 पुरस्कारासाठी स्तर निहाय वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

               31 मार्च 2022 पर्यंत ऑनलाईन नामांकन सादरीकरण (शाळास्तर) .
1 एप्रिल २०२२ ते १५ मे २०२२ --- शाळांची पडताळणी  व निवड (जिल्हा पडताळणी समिती)
 22 मे 2022 पर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केलेल्या शाळांची यादी पाठवणे (जिल्हा पडताळणी समिती.) 
22 मे ते 30 जून २०२२ ---- राज्यस्तरीय पुरस्कारासाठी शाळांची पडताळणी व निवड (राज्यस्तरीय पडताळणी समिती. )
1 जुलै ते 7 जुलै २०२२  राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडलेल्या शाळांची यादी सादर करणे.( राज्य पडताळणी समिती)
 ७ जुलै  ते ७ सप्टेंबर २०२२  राज्यस्तरावरून शाळांची पडताळणी (राष्ट्रीय पडताळणी समिती)
 15 ऑक्टोंबर 2022 जागतिक हात धुवा दिन या दिवशी पुरस्कार प्रदान सोहळा (संभाव्य) राष्ट्रीय पडताळणी समिती.
           तरी या स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी जास्तीत जास्त शासकीय , अनुदानित व खाजगी शाळांनी शाळांनी सहभागी व्हावे या संदर्भात माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे  यांनी परिपत्रक काढलेली आहे.
खालील परिपत्रक पहा व download करा....!!! 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.