जिल्हांतर्गत बदली पूर्वतयारी / पूर्व प्रक्रिया




२ . जिल्हांतर्गत बदली बाबत पूर्वतयारी / पूर्व प्रक्रिया 

जिल्हांतर्गत बदली करण्यासाठी जिल्हास्तर वरून खालील प्रक्रिया व पूर्वतयारी केली जाते.

बदली पूर्व प्रक्रिया मध्ये  शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली यांसाठी आवश्यक माहिती प्राप्त करून प्रसिद्ध करणे. 

2.1 जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे परिशिष्ट 1 मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवालानुसार अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांची व सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसिद्ध करतील. 

2.2 प्रशिक्षण जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी हे आयोजित करतील.

2.3  शाळा निहाय रिक्त जागा घोषित करणे

2.3.1.  मुख्य  कार्यकारी अधिकार्‍यांकडे  जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती निश्चित करतील. सदर कार्यवाही करीत असताना प्रथमता माननीय मुख्य न्यायालयाच्या रिट याचिका क्रमांक 3278 / 2010 बाबत, दिनांक 13 .9. 2012 व दिनांक 21. 11. 2012 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने या भागातील रिक्त जागा निश्चित करण्यात याव्यात. त्यानंतर जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती तालुकानिहाय व शाळा निहाय शक्यतो समप्रमाणात निश्चित करण्यात येईल. यामध्ये निव्वळ रिक्त असलेल्या जागा तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकांच्या रिक्त जागा दाखवण्यात येतील .त्याचप्रमाणे अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार  प्राप्त शिक्षकांना बदली हवी आहे. त्या जागा दाखवण्यात येतील. 

2.3.2 समानीकरण यासाठी रिक्त ठेवायची पदे भरती किंवा अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या समायोजनाचा द्वारे उपलब्ध झाल्याशिवाय समुपदेशनासाठी खुली करता येणार नाहीत.

 2.3.3 अशाप्रकारे शाळा निहाय ठेवायच्या रिक्त पदांची यादी मुख्य कार्यकारी अधिका-यांकडून जाहीर करण्यात येईल. 

2. 3.4 शिक्षकांच्या बदल्या करीत असताना समानीकरण यासंदर्भात रिक्त ठेवाव्या लागणाऱ्या जागांवर बदलीने नियुक्ती दिली जाणार नाही. 

2.4  शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे 

2.4.1 शिक्षणाधिकारी प्रथमता प्रतिवर्षी बदलीस पात्र शिक्षकांच्या (सर्वसाधारण तसेच अवघड क्षेत्र) याद्या प्रसिद्ध करतील. 

2.4 .2 तसेच विशेष संवर्ग भाग 1 व भाग 2 मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करतील. 

2.4.3 उपरोक्त नमूद या बाबत आक्षेप असल्यास याद्या प्रसिद्ध झाल्यापासून 5 दिवसात शिक्षणाधिकार्‍यांकडे याद्यांमधील दुरुस्तीसाठी संबंधित शिक्षकास अर्ज करता येईल. या अर्जावर शिक्षणाधिकारी हे पुढील सात दिवसात निर्णय घेतील शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्णयाने संबंधित शिक्षकांचे समाधान न झाल्यास त्याबाबत अपील सदर निर्णयाच्या दिनांकापासून 5 दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे करता येईल सदर अपिलावर मुख्य कार्यकारी अधिकारी सात दिवसात निर्णय घेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेला याबाबतचा निर्णय अंतिम असेल.


(संदर्भ : शासन निर्णय दि ७ एप्रिल २०२१ कलम क्र २ )

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .