जिल्हांतर्गत बदली प्रतिनियुक्तीबाबत महत्वाचे

 




जिल्हांतर्गत बदली  प्रतिनियुक्तीबाबत 

    जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रतिनियुक्ती हा नवीन बदल (शेवटचा एक पर्याय ) या शासननिर्णय मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे . आपण सविस्तर समजावून घेवू.

           जिल्हा परिषद शिक्षकांच्या होणाऱ्या जिल्हांतर्गत बदलीच्या प्रचलित  संगणकीय प्रक्रियेच्या प्रस्तावित शासन निर्णयामध्ये दिनांक 1 मे ते 31 मे पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सूचित केले आहे, परंतु त्याव्यतिरिक्त काही अपरिहार्य व योग्य कारणास्तव (प्रसूती रजेवर, बाल संगोपन रजेवर, गंभीर अपघातामुळे किंवा इतर बाबी) बदली करावयाची झाल्यास ती बदली न करता प्रतिनियुक्ती करण्यात यावी. सदर प्रतिनियुक्ती ही विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी मान्यतेने करण्यात यावी. प्रतिनियुक्ती करताना खालील बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. 

1 बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर होणाऱ्या रिक्त पदावर प्रतिनियुक्ती करण्यात यावी. 

2 त्या ठिकाणी शैक्षणिक अडचण होणार नाही याची खात्री शिक्षणाधिकारी यांनी करावी.

 3 एका महिन्यात प्रतिनियुक्ती मागणी करणाऱ्या शिक्षकांचे अर्ज मागून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी यादी तयार करावी.

 4 कोणकोणते शिक्षक प्रतिनियुक्ती साठी  पात्र आहेत ते ठरविण्याबाबत जिल्हास्तरावर खालीलप्रमाणे समिती नियुक्ती करण्यात यावी. 

      1)  उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जिल्हा परिषद -अध्यक्ष

      2) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद -सदस्य 

      3) शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  जिल्हा परिषद -सदस्य 

 5  समितीने पात्र  ठरवलेल्या शिक्षकांमधून सेवाजेष्ठताने एका जागेसाठी तीन शिक्षकांचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्फत विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात येतील. विभागीय आयुक्त हे सादर केलेल्या प्रस्तावातील 1 जागेसाठी एका शिक्षकाला प्रतिनियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करतील.

 6 सदर प्रतिनियुक्ती ही पाच वर्षातून एकदा देता येईल. 

 7 प्रतिनियुक्ती दिल्यानंतर संबंधित शिक्षक पुढील वर्षीच्या बदलीच्या  (1 ते 31 मे) होणाऱ्या प्रक्रियेमध्ये सेवाज्येष्ठतेनुसार बदलीस पात्र होईल.

8 प्रतिनियुक्ती दिल्यानंतर त्यांची नियुक्ती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणची मूळ सेवा धरण्यात येईल.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. बदली प्रक्रिया झाल्यावर जागा रिक्त कशा राहतील ? ज्या असतील त्या अनिवार्य रिक्त असतील .

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .