संवर्ग ४, बदलीस पात्र शिक्षक व्याख्या,बदली प्रकिया व कार्यपद्धती





बदलीस पात्र शिक्षक व्याख्या  (संवर्ग ४ )

        बदली जिल्हांतर्गत बदली च्या नवीन धोरणामध्ये बदलीस  पात्र शिक्षकाची नवीन व्याख्या केली आहे .ज्याला आपण संवर्ग ४ म्हणतो .

             बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची  सेवा पाच वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक. तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील पाच वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठते प्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रांमध्ये बदली करून पदे स्थापित करण्यात येईल.

( बदलीस पात्र शिक्षकांसाठी अवघड क्षेत्रासाठीचा वरील उल्लेख देखील खूप महत्वाचा आहे )  



 टप्पा क्र ५ :  बदलीस पात्र शिक्षकांची (संवर्ग  ४ ) बदली करण्याची कार्यपद्धती (४.५)

 4.5.1  टप्पा क्रमांक 1, 2, 3, व 4 मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीपात्र शिक्षक यांची एक जेष्ठता यादी जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. 

4.5.2  सेवाजेष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुज्ञेय राहील.

 4.5.3  या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राधान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील, परंतु या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत. त्या शाळेत ठेवायचा रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील त्याच रिक्त पदांवर बदली होऊ शकते. 

4.5.4 या शिक्षकांनी पसंतीक्रम प्राधान्यक्रम दिल्यास व वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदली नियुक्ती केली जाईल. 

4.5.5  सर्व शिक्षकांना किमान तीस अथवा टप्पा क्रमांक 4 ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पासून पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.


विस्थापित शिक्षक 

       टप्पा क्र ५ म्हणजेच बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर ज्या शिक्षकांना शाळा मिळणार नाहीत ते शिक्षक विस्थापित शिक्षक म्हणून गणले जातील . अशा विस्थापित शिक्षकांसाठी अजून एक शेवटची संधी दिली जाईल .

        शिक्षकांसाठीचा  शेवटचा  टप्पा क्रमांक पाच पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येईल व टप्पा क्रमांक 5 मधून उरलेल्या शिक्षकांना त्यांना पसंती क्रमामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येईल. टप्पा क्रमांक पाच नुसार सर्वांची सेवाज्येष्ठता व पसंतीक्रमानुसार बदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान तीस अथवा टप्पा क्रमांक पाच बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. या विस्थापित शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमात प्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

22 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. संवर्ग 4 मध्ये 5 वर्षेसेवाऐवजी 4 वर्षे पाहिजे होती.

    उत्तर द्याहटवा
  2. संवर्ग चार मध्ये युनिट वन चा उल्लेख नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. पण बदली प्रक्रिया कधी सुरु होणार आहे

    उत्तर द्याहटवा
  4. अहो साहेब चार ,पाच वर्षात एवढे दिव्यांग निर्माण होऊ लागले की आता अशी भीती वाटते की आम्ही पण divyang होऊ शकतो की काय? कृपया सर्व दिव्यांग प्रमाणपत्राची खात्री सद सद विवेक बुद्धीने व्हावी व खर्‍या दिव्यां ग बांधवाना न्याय द्यावा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बोगस दिव्यांग शोधून थेट बडतर्फ करण्याची कार्यवाही करावी लागते तेव्हा कुठे बोगसगिरी बंद होईल

      हटवा
  5. सर्व साधारण क्षेत्रात दहा वर्षे याचा अर्थ स्पष्ट करा

    उत्तर द्याहटवा
  6. मेंदूच्या आजारामध्ये कोणकोणते आजार येतात ते सांगावे मराठी डिसऑर्डर हा आजार मेंदूच्या आजारात येतो का

    उत्तर द्याहटवा
  7. एन्जय टी डीस ऑर्डर ऑर्डर

    उत्तर द्याहटवा
  8. 10 वर्षापूर्वी ज्यांनी अवघड क्षेत्रात काम केलेले आहे अशा शिक्षकांच्या बाबतीत नेमकी काय भूमिका आहे ती स्पष्ट व्हावी...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आम्ही 8 वर्षा पूर्वी अवघड क्षेत्रात सलग 10 वर्षे काम केले आहे... एकूण सेवा 18
      एकूण सेवा 18 वर्षे झाली... पण सर्व साधारण क्षेत्रात 8 वर्ष सेवा झाल्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे. आता या बदली प्रक्रियेत तरी होईल का... बदली..आमची

      हटवा
  9. अंतरजिल्हा बदली आलेले संवर्गानुसार बदली नियम सांगा

    उत्तर द्याहटवा
  10. सर संवर्ग २ मध्ये एकदा बदली झाल्यास लगेच पुढील वर्षी जोडीदार बदलीपात्र असेल तर दोघांनाही संरक्षण मिळेल काय?की बदलीपात्र मध्ये येणार मार्गदर्शन करावे.

    उत्तर द्याहटवा
  11. ज्या बदलिपात्र शिक्षकांनी 10 वर्षापूर्वी दुर्गम भागात काम करून सध्या सलग 10 वर्षे सुगम मध्ये आहेत, त्यांना पुन्हा दुर्गम मध्ये जावे लागणार का ? याबाबतचे धोरण स्पष्ट करा कृपया...

    उत्तर द्याहटवा
  12. पती पत्नी दोघेही 30 km च्या आत आहेत आणि दोघेही बदलिपत्र आहेत तर ते संवर्ग 4 मध्ये येतात की संवर्ग 2 मध्ये येतात मग त्यांनी फॉर्म कसा भरावा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. दोघांनाही 1 युनिट ग्राह्य धरून सेवाजेष्ठता यादीत दोघांपैकी ज्याची सेवा जास्त आहे त्याच वेळी दोघांचीही बदली होईल

      हटवा
  13. पती-पत्नी तीस किलोमीटरच्या आत सेवेत आहेत व एक जण बदली पात्र आहे तर दुसऱ्याला याचा लाभ होतो का

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. 30 किमी च्या आत असलेने संवर्ग 4 मध्ये आहोत.दोघेही पती पत्नी बदली पात्र आहोत .तर बदली अर्ज दोघांनीही भरायचे का?की एक युनिट मानून एकच अर्ज भरायचा

      हटवा
  14. मी बदलिपात्र असून मला संवर्ग 1 कडून खो बसला आहे तर ज्या वेळी मी संवर्ग 4 मधून फॉर्म भरेन त्या वेळी मला इतर बदलिपत्र शिक्षक पेक्षा काही अधिकचा लाभ मिळेल का कृपया उत्तर द्या

    उत्तर द्याहटवा
  15. सर्व बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या होणार की फक्त ज्यांना खो बसला त्यांचीच बदली होणार?

    उत्तर द्याहटवा
  16. 5 वर्ष पूर्ण होण्यासाठी कोणती तारीख धरली

    उत्तर द्याहटवा
  17. संवर्ग एक एका शाळेत किती असावे याचे देखील नियम पाहिजे .

    उत्तर द्याहटवा
  18. माझी सेवा एकाच शाळेवर 29 मे महिन्यात सहा वर्षे होत आहे. माझी या वर्षी बदली होऊ शकते का. किंवा यावर्षी बदल्या नक्की होणार आहेत का. तसा gr निघाला आहे का

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .