विशेष संवर्ग भाग दोन चे निकष, बदली प्रक्रिया व कार्यपद्धती

  



विशेष  संवर्ग भाग दोन चे निकष


           जिल्हा अंतर्गत बदली नवीन धोरणामध्ये  मध्ये विशेष संवर्ग भाग २ हा तयार करण्यात आला आहे . जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून 30 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.

 1.9    संवर्ग २ चे निकष व प्राधान्यक्रम 

 1.9.1  पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर

 1.9.2 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर  

1.9.3  पती-पत्नी दोघेही एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर 

1.9.4 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्यशासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका / नगरपालिका 

1.9.5 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी 

1.9.6 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक/ कर्मचारी असेल तर




४.३ संवर्ग २ ची बदली प्रक्रिया व कार्यपद्धती (टप्पा क्र. ३ )

 

4.3.1  टप्पा क्रमांक दोन प्रमाणे ( संवर्ग १ च्या बदल्या ) कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष  संवर्ग भाग दोन शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल, तद्नंतर विशेष संवर्ग भाग-2 यांच्या बदल्या करण्यात याव्यात. 

4.3.2 जे शिक्षक विशेष  संवर्ग  भाग दोन मध्ये मोडतात. त्यांना विवरण पत्र क्रमांक चार मधील नमुन्यात स्वयंघोषित प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे. 

4.3.3 जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकेल.

 4.3.4 उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्य पद्धती लागू होतील. या तरतुदीप्रमाणे संबंधितांची बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक युनिट म्हणून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा 30 किमी परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघेही पती-पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यायचे आहे. यापैकी एकाची पण दहा वर्षे सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र धरण्यात येईल. 

4.3 .5 तीस किलोमीटर रस्त्यांची अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदर चे 30 किमी रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील. 

4.3.6  विशेष संवर्ग दोन च्या खाली बदली घेतल्यास पुढील तीन  वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.


(संदर्भ : जिल्हा अंतर्गत बदली शासननिर्णय दि ७ एप्रिल २०२१)

टिप्पणी पोस्ट करा

25 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. जर आज अंतर 27 किमी आहे व एकच जण बदलीपात्र आहे. पत्नीची अवघड क्षेत्रातून 4वर्षांपूर्वी बदली झाली आहे तर काय करावे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. पती बदली पात्र 10 वर्ष पुर्ण असल्याने दोघांना १ unit मानून दोघांचिही बदली होईल ।

      हटवा
  2. संवर्ग 2 साठी बदली करण्या आधी काही सेवेची अट आहे का

    उत्तर द्याहटवा
  3. सर माझी पत्नी बदली पात्र आहे व आमचे ठिकाण 30 कि मी च्या आत आहे परंतु आम्हाला बदली पाहिजे तर कोणत्या संवर्ग मधुन फार्म भरावा

    उत्तर द्याहटवा
  4. माझे पती आणि मी लगतच्या जिल्ह्यामध्ये आहोत व दोन्ही जिल्ह्याच्या बॉंड्री वरील गावे 30 किमी च्या आत आहेत तर मला जिल्हांतर्गत बदली मध्ये संवर्ग 2 मध्ये फॉर्म भरता येईल का?

    उत्तर द्याहटवा
  5. पती पत्नी दोन जिल्यात आस्तील तर सवर्ग दोन मधुन भर्ता यतो ka

    उत्तर द्याहटवा
  6. लगतच्या जिल्ह्यातील कर्मचारी संवर्ग दोन मध्ये फायदा घेऊ शकतात का

    उत्तर द्याहटवा
  7. सर, सध्या मी व माझे पती आम्ही एकाच शाळेत कार्यरत आहोत. परंतु माझे पती ५३+मध्ये संवर्ग एक मध्ये बदली करत आहेत, जर त्यांची 30 किमी. च्या पुढे बदली झाल्यास नंतर संवर्ग दोन मध्ये बदली करता येईल का?

    उत्तर द्याहटवा
  8. सर, मी बदली पात्र आहे व पत्नी जि प मध्ये शिक्षिका असून दोघांचे अंतर 30कि.मी.आहे, संवर्ग दोन मधून एक एकक म्हणून फॉर्म भरता येईल ना? मार्गदर्शन करावे

    उत्तर द्याहटवा
  9. सर, मी बदली पात्र असून पत्नी जि प मध्ये शिक्षिका आहे, दोघांच्या शाळेचे अंतर 4किमी आहे, संवर्ग 2मधून एक एकक म्हणून फॉर्म भरता येईल ना? मार्गदर्शन करावे

    उत्तर द्याहटवा
  10. बदली साठी काय काय पुरावे जोडावे लागणार आहेत.

    उत्तर द्याहटवा
  11. पण बदल्या लवकर सुरु करा म्हणावं कंटाळा आला आहे त्या परीपत्रकांचा रोज उठून तेच ...कार्यवाही शून्य

    उत्तर द्याहटवा
  12. मी बदली पात्र आहे संवर्ग 2 साठी पती पत्नी एकत्रीकरण साठी दोघेही एकाच जिल्हा असणे आवश्यक आहे का

    उत्तर द्याहटवा
  13. संवर्ग 2 मधून अर्ज भरला पर्यायांपैकी शाळा मिळाली नाही तर विस्थापित व्हावे लागेल का?

    उत्तर द्याहटवा
  14. सर पती अवघड क्षेत्रात आहे ,पतीची चार वर्षे सेवा झालेली आहे ,पत्नी सोप्या क्षेत्रात आहे ,सध्या दोघेही बदली पात्र आहे, एक मिनिट म्हणून संवर्ग तीन मधून पतीने अर्ज भरून पती व पत्नी दोघांचीही बदली होईल का मार्गदर्शन करावे

    उत्तर द्याहटवा
  15. मी जि.प.ला असून पत्नी संस्थेवर कार्यरत आहे तर कोणता पर्याय निवडावा

    उत्तर द्याहटवा
  16. सर, संवगॅ 2 साठी 6 निकष ( 1.9.1 ते 1.9.6) असे आहेत. परंतू संवगॅ 2 मधून बदली करताना सर्व शिक्षकांच्या सेवा जेष्ठता यादी प्राधान्य क्रमाने होईल ना....

    उत्तर द्याहटवा
  17. सर पत्नी जिल्हा परिषद ला आहे बदली पात्र आहे पण मी संस्थेत आहे अनुदानित संस्थेत आहे व आमच्या दोघांचा अंतर सात किलोमीटर आहे तर बदली स्वर्ग दोन चा फायदा घेता येईल का व स्वर्ग मध्ये चार भरला तर तीस किलोमीटर आत गाव मिळेल का

    उत्तर द्याहटवा
  18. Hi सर
    मी रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक आहे. मी मूळचा रायगड मधील आहे. माझी पत्नी अंगणवाडी सेविका आहे रायगड जिल्ह्यात. सर मी संवर्ग दोन पती पत्नी एकत्रीकरण साठी पात्र आहे का .....?

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .