महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 30 जानेवारी रोजी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे.

             



          महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 30 जानेवारी रोजी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे   

           महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 30 जानेवारी रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेणे व राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक 24 जानेवारी २०२२ रोजी पारित झालेला आहे. 

          महात्मा गांधीजी हे विसाव्या शतकामध्ये प्रभाव पाडणारे एक महान असे व्यक्तिमत्व होते. गांधीजींची सत्य, अहिंसा, प्रेम, स्वच्छता, स्वावलंबन, स्वदेशी, भूतदया, मानवता, अशा विचारांना पाईक मानून त्यांनी आपला जीवन मार्ग अवलंबला होता. मानवता आणि अहिंसा  हाच आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी नव्हे, तर अखिल मानव जातीसाठी व्यतीत केले आणि मानवाच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतले. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना महात्मा म्हणून एका पत्रात संबोधित केले. तेव्हापासून ते लहान मुलांसाठी साठी महात्मा झाले .

           या महात्म्याच्या स्मृती दिनानिमित्त व हुतात्मा दिनानिमित्त 30 जानेवारीला राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना व नव्या पिढीला महात्मा गांधीजींच्या विचारांची ओळख करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सर्व शाळांमध्ये विद्यार्थी व  शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यामुळे हा शासन निर्णय पारित करुन शासनाने निर्णय घेतला आहे की राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी खालील विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा.

 

  सर्व शाळांमध्ये प्रतिमापूजन, हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रार्थना गायन.
 २ सर्व सहभागी घटक-स्वच्छता-आपले घर व परिसर यांची स्वच्छता करणे.
  पहिली ते पाचवी 
     १  प्रार्थना 
         महात्मा गांधींच्या आवडीच्या प्रार्थना भजन यांचे गायन व वेशभूषेचे सह एकपात्री अभिनय.
     २ स्वावलंबन 
        ३० तारखेला घरातील स्वतःची कामे स्वतः करणे दिवसभरातील उत्कृष्ट कृतींचे सादरीकरण.

  सहावी ते आठवी  सत्कृत्य  या उपक्रमांतर्गत केलेल्या चांगल्या कामांचे कामांचा दोन मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करणे. उदाहरणार्थ स्वच्छता, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, खरे बोलणे, नीटनेटकेपणा, आई-बाबा, भाऊ बहीण, आजी आजोबा, शेजारी, नातेवाईक यांना कोणत्याही कामात केलेली मदत.
  नववी ते बारावी 
हस्त उद्योग-स्वतःची आवड छंद याचा विचार करून एका हस्त उद्योगाची माहिती घ्यावी व दोन मिनिटांची व्हिडिओ चित्रीकरण करुन अपलोड करावे.
 ६ शाळास्तर,तालुकास्तर,जिल्हास्तर
    १ मातृभाषेतून शिक्षण 
     मातृभाषेतून शिक्षण यातील विविध पैलूंवर परिसंवाद आयोजित करणे.
    २ अहिंसा 
         वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे
       १ अहिंसात्मक वृत्ती काळाची गरज
       २ उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया
       ३ चले जाव चळवळ 
७ राज्यस्तर 
          SCERT मार्फत मान्यवरांची महात्मा गांधी यांचे जीवन आणि विचार यावर लाईव्ह व्याख्यान दिनांक 30 जानेवारी 2000 22 वेळ सकाळी 11:00 वाजता लिंक युट्युब लाईव्ह
   https://youtu.be/eKc8s4rZei4

           वरील प्रमाणे विद्यार्थी व शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या सादरीकरणाचा दोन ते तीन मिनिटांचा सुस्पष्ट व्हिडिओ,फोटो व इतर साहित्य समाज संपर्क माध्यमांवर फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, #naitaim2022 या Hashtag वापर करून अपलोड करण्यात यावेत. त्या पोस्टची लिंक https://scertmaha.ac.in/competitions/ येथे देण्यात यावी.सदर कार्यक्रमाचे आयोजन करीत असताना covid-19 च्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचना, सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे पालन काटेकोर पालन करावे अशा विविध  सूचना दिलेल्या आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.