ऑनलाईन एज्युकेशन सर्वेक्षण टप्पा क्र १ (सन २०२१ - २०२२)
रविवार दि १२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण व शिक्षण विभाग प्राथमिक,जिल्हा परिषद सातारा यांचेमार्फत २ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळातील (जि प व न पा ) जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे . हे सर्वेक्षण ऑनलाईन होणार असून प्रत्येक तालुक्याची स्वतंत्र लिंक दिली जाणार आहे . लिंक आपल्याच तालुक्याची आहे का ते खात्री करावी. लिंक ओपन केल्यानंतर दिलेल्या सूचना वाचून प्रथम केंद्राचे नाव सिलेक्ट करायचे आहे.त्यानंतर आपली शाळा निवडावी .त्यानंतर आपले नाव इंग्रजीतच टाकावे. नंतर इयत्ता निवडावी व सर्वेक्षण फॉर्म भरायचा आहे . सर्वे मधील प्रश्न बहुपर्यायी आहेत . फॉर्म सर्वात शेवटी सबमिट करायला विसरू नये .
सर्वेक्षणातील तपशील,इयत्ता निहाय , विषय निहाय गुणदान व प्रश्न संख्या
सर्वेक्षणाबाबत अधिक मार्गदर्शक सूचना आवश्य वाचा.
टीप : सर्वेक्षण झाल्यानंतर तालुका निहाय ,इयत्ता निहाय व विषय निहाय विश्लेषण केले जाईल .
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .